पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्थान तिचे मनातले

विषय... स्थान तिचे मनातले

शीर्षक... (आठवणी चा तो ठेवा )

 

स्थान तिचे मनातले 

होते  केवढे  ते  घट्ट 

जगातील श्रेष्ठ आई 

पुरविते    सारे    हट्ट 

 

होते  ठाऊक  सर्वांना 

स्थान  तिचे  मनातले

देत   असे  मान  तिला 

मोठे,  लहान,  घरातले 

 

काळजात    जपलाय 

(आठवणी चा  तो  ठेवा )

स्थान  तिचे  मनातले

नको   घालवू   तू   देवा 

 

झाले   जेव्हा  सासरची 

डोळे   तिचे   पाणावले 

संपणार  नाहीं  कधी 

स्थान तिचे मनातले

 

सौ. रेखा अडसुळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू