पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पायी बांधले चाळ ( अष्टाक्षरी )

सारी बंधने तोडून

पायी बांधले चाळ

बदलली जरी नारी

नाही बदलला काळ


झाली स्थिती भयंकर

पडे उघडा संसार

भक्ष्य ठरली अबला

केली पशूंनी शिकार


मार्ग झाला बंद तिचा

जगण्याचा सन्मानाने

डाव खेळला अघोरी

तिच्या कपटी दैवाने


क्षुधेसाठी लेकरांच्या

नाचे घुंगरू बांधून

तरी जपते मनात

तिचे संस्कार अजून

〰️〰️〰️〰️〰️〰️

©️®️

✍️...एंजल वैशू

(वैशाली पडवळ )

अहमदनगर

८४३३७६४२००


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू