पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

केले कबूल

केले कबूल 


   फुलगाव आणि आणि सुनगाव ही दोन जुळी 

खेडी होती . जसे एका आईची दोन  जुळी

मुले असतात ना _ _ ! अगदी तसेच . या दोन

गावांच्या मधे फक्त नदीचं आडवी . त्यामुळे

 काय  ती दोन गावं वेगळी दिसत . म्हणून

ती जुळी गावे . तर त्या सुनगावमधे एक सम्या

राहत होता. तसे त्याचे ओरिजिनल नाव

समीर होते. लोक त्याला मानाने सम्या म्हणत.

सम्यालाही  हेच नाव आवडत असे . बाजूच्या

म्हणजे फुलगावात रुपाली राहत होती .

नावाप्रमाणे ती रूपाने देखणी होती . रूपालीला

सर्व रूपा म्हणत . रूपा आणि सम्या दोघेही

तरुण . येता , जाता त्या दोघांची कुठे ना कुठे

नजरा नजर व्हायची . कधी वावराच्या मेरीवर,

तर कधी नदीकाठच्या मंदिरात तर कधी 

आठवडी बाजारात . नजरेच्या खेळातून , 

प्रेमाचे बाण अचूक सोडले गेले होते . पण

प्रेमाची गाडी पुढे काही सरकत नव्हती .

सम्या खूप प्रयत्न करायचा , पण रुपाशी कधी

एकट्यात त्याचे बोलणे होत नसे.


     कधी कधी ती दोघे एकाच एस. टी. मधून

तालुक्याच्या गावी जात असत. रूपाला बस

मध्ये बघून सम्याचे दिल धडधड करायचे . ती

पण तिरप्या अँगलने , त्याच्या कडे बघायची .

सम्याला वाटायचे की , चला आता रुपाशी

बोलायची संधी मिळते . पण कसले काय ?

 रूपा सोबत नेहमी कुणी तरी असायचे .

 त्यामुळे बोलायची.पंचाईत. तो  नेहमी तिच्याशी 

बोलण्याचा चान्स शोधत असायचा . एक दिवस , मिळाला चान्स . त्याचे असे झाले की _ _ _ 


सम्या इलेक्ट्रिकचे बिल भरायला तालुक्याला

गेला होता. बिल भरून झाल्यावर तो , घरी

परत जाण्यासाठी एस टी. स्टँड वर आला . तर

समोर रूपा उभी दिसली . त्याने आजूबाजूला

कानोसा घेतला . ती एकटीच होती . अहाहा _  _ 

मस्तच चान्स मिळाला . साम्यला  भर दुपारी

आकाशात चांदण्या दिसू लागल्या . त्याने

दुरूनच मोबाईल मधे तिचा फोटो काढून

 घेतला. नंतर तिच्या  जवळ गेला. त्याला

 दरदरून घाम फुटला . काय बोलावे हे सुचेना.

तिचीही अवस्था तशीच झाली होती .


शेवटी हिम्मत करून तो , तिच्याशी बोलायला गेला. 


. सम्या ' "हाय रूपा . "

रूपा :  " हाय , समीर ."

तिने त्याला समीर म्हणताच तो लाजला .


सम्या : " ऊन भयंकर आहे . चल आपण

उसाचा रस प्यायला जाऊ. "



काहीही न बोलता रूपा गोड हसली . सम्या

सोबत रस प्यायला तयार झाली. ती दोघे दोन

पाऊले जात नाही, तोच तिचा  भाऊ आला .

त्याला पाहताच सम्याचे मस्तक ठणकले .


आत्ताच याला कलमडायचे होते का ?


       सम्या मनात म्हणाला .


सम्याला तिचा भाऊ म्हणतो कसा,


"लय ऊन हाय गड्या . बाजारातून हे सामान

आणुन जाम थकलो मी. तू माझा शिवभाऊ

तुझ्यावर भरवसा हाय. मी असं करतो हे

समान इथच ठेवतो . तू या सामानवर लक्ष ठेव.

रूपा आणि मी रस पिऊन येतो ."


    दात ओठ खात सम्या बसला सामानाची 

रखवाली करत. तोंडाशी आलेला घास पळविने

काय असते , हे सम्याला आज कळले .




दिवसा मागून दिवस गेले, पण सम्याला रूपाशी

बोलणे काही जमले नाही. रोज रात्री मोबाईल

मधील रूपाचा फोटो बघून , तो त्या फोटोशी

बोलत होता. सुगीचे दिवस संपले अन् सुरू

झाली लगन घाई . सम्याचा मोठा भाऊ गण्या

लग्नाचा होता. पाच सहा पोरी पाहण झाल्यावर

गण्याच लग्न नेमक रुपाशी पक्क झालं.


आता झाली की , नाही पंचाईत _  _ _ !


नेमका त्याच वेळी सम्या त्याच्या आत्याकडे

गेला होता. अत्याच्या मळ्यातील टरबूज

 काढण्याचे काम होते  . तिकडून आल्यावर

त्याला हे मिस मॅच लग्नाचे कळले . पण

घरात उघड उघड तो काही बोलू शकत नव्हता.

पण मनातल्या मनात मात्र रडत होता. चिडत

होता  . रूपाने तरी या लग्नाला नकार द्यायचा 

असता  . ती पण माझ्यावर जीव लावते . तरी

ती माझ्या भावा  सोबत लग्न करायला कशी

तयार झाली . तिच्याशी बोलायची संधी भेटत नव्हती की मनातील प्रेम घरात कुणाला सांगता पण येत नव्हते . सम्या आतल्या आत स्वतःवरच चिडत

 होता  . मग कायत्याने  खाणे पिणे सोडले .

 रोजच्या रोज त्याचे किलो किलोने वजन कमी 

होऊ लागले . त्याची तब्बेत अशी पाहून , त्याची

 माय म्हणाली,


"आत्याच्या घरी सम्याले भुतान झपाटल , म्हणून

तर हे पोरगं अस करून राहील ."


घरातील लोकांसमोर सम्या काही बोलत नव्हता.

पण रूपा साठी मात्र मनातून झुरत होता.



आता गाण्याच्या अन् रूपाच्या कुंकवाचा दिवस जवळ आला . नवीन सुनेसाठी म्हणजेच रूपा

साठी काठाची साडी अन् अंगठी आणली.

आता मात्र , सम्याने  काहीतरी करायचे

ठरविले . या चान्स गेला तर भाऊ दुसरा 

मिळणार नाही. असा विचार करून सम्याने

मग शक्कल लढविली_ _ _ 



त्याने काय केले असेल बरे ??



त्याने कुंकावासाठी आणलेली, रुपाची साडी

आणि अंगठी  लपवून ठेवली . साडी अन्

अंगठी कुठेच दिसत नाही, म्हणून सम्याच्या

मायने सारे घर डोक्यावर घेतले . सर्वजण

अंगठी शोधण्याच्या कामात लागले . दुपारचे

दोन वाजले तरी , घरात चूल पेटली नाही .

सर्वच ठिकाणी अंगठी शोधून झाले , पण

कुठेच सापडली नाही . सम्याची  आत्या , एका

डब्यात अंगठी शोधायला गेली , तर तिला

गव्हाच्या चिकाच्या कुरडया दिसल्या .  तो

डबा तिने सम्याच्या माय समोर आपटला . 


"काहो , वहिनी तुम्हाले   काल , माया पोरासाठी

कुरया  तळा म्हणल, तर कुरळ्या संपल्या

म्हणत होत्या . आता या डबाभर कुरळ्या कुठून

आल्या . "


"अहो , रख्माबाई माय ध्यानच नव्हतं , या डब्यात

कुरळ्या आहेत ते _  _ " माय


"ते काही नाही वहिनी , तुमाले , आम्ही माहेरी

आलेलो खपतच नाही. काही ना काही कुरापती

काढून आम्हाले हाकलून देत राहता . "


"असं , काही नाही रखमा बाई . तुमी मायावर

भलते आरोप , नका लावू . मी इतके मनापासून

तुमचे सण वार करते अन् तुमी , असे आरोप

लावता . " माय


दोघी नणंद , भावजयचे  एकमेकिंवर आरोप ,

प्रत्यारोप सुरू होते . सम्या गालात हसून त्यांचे

प्रेमाचे भांडण ऐकत होता . ते भांडण त्याच्या

पथ्यावर पडले होते. त्या निमित्ताने सर्व ,

हरवलेली अंगठी विसरले होते .

 "बरच झालं, अंगठी  बद्दल सर्व विसरले . 

अंगठी  नाही मिळाली तर  , कुंकवाचा कार्यक्रम होणार न्हाई.  पुढचं पुढे पाहून घेऊ . आता पुरते 

लग्न तर  टळेल  . " 


लगेच दुसरी सोन्याची अंगठी आणू शकतील

इतके काही सम्याचे कुटुंब श्रीमंत नव्हते .


असा मनाशी विचार करीत , सम्या भांडणात

तेल ओतत होता . कधी आईची बाजू घेत होता

तर कधी आत्याची बाजू घेत  होता . शेवटी

संध्याकाळ पर्यंत भांडण मिटले . सर्वांना भूका

लागल्या होत्या. लगेच खिचडी बनवून सर्व

जेवायला बसले. सम्या मनातून खुश होता . 


जेवण होत नाही तोच , सम्याचा इब्लिश भाचा

सोहम अंगठी आणि साडी  हातात घेऊन 

नाचत नाचत आला .


"सापडली सापडली , नव्या मामीची अंगठी आणि

साडी सापडली ." असे तो जोराने ओरडत होता.


सर्वजण सोहम भोवती गोळा झाली .  अंगठी

शोधली म्हणून सोहमचे कौतुक होऊ लागले .

सम्या मात्र , सोहम वर दात ओठ खात उभा होता.


शेवटी कुणीतरी सोहमला विचारले ,


"ही  साडी आणि अंगठी तुला सापडली तरी कुठे ?"


"तिथेच होती , आबाच्या  कपाटात ."

सोहम


"पण तिकडे , हे अंगठी अन् साडी गेली तरी कशी ?

मी तर ते आलमारीत ठेवली होती. अबाच्या

कपाटाला कुणी हात लावायची हिम्मत करीत 

नाही  . मग ही अंगठी अन् साडी तिथं कुणी 

ठेवली  असीन बरं ?" माय


सम्या कडे बोट दाखवीत, सोहम म्हणाला,


" या . सम्या मामाने तिथं लपवून ठेवले होते ."


"मग , तू आधीच का  नाही सांगितले ." गण्या


"मामाने लपवून ठेवले होते , हे मी बघितलं होतं,

पण मग विसरून गेलो . आता आठवल , अन्

पटकन आणल ." सोहम



. आता सर्वांसमोर सम्याचा चेहरा उतरला .


शेवटी सम्याला कबूल करावेच लागले की ,

त्याचा रुपावर जीव जडलाय . त्यासाठी त्याने

हे सर्व केले आहे. हे ऐकून सर्वजण हसायला

लागले . माय म्हणाली,


"आत्याच्या घरून , रूपा नावाच्या भूताने झपाटले

होते म्हणायचे . मला वाटल दुसरे कोणते भूत 

होते _  _ _ ?"



      सम्या लाजला . 


त्याच अंगठी आणि साडीवर सम्याचा आणि

रूपाचे कुंकू लागले .


आता सम्याच्या भावासाठी मुलगी शोधणे सुरू

आहे . मुलगी पसंत पडताच , दोन्ही भावांचे

एकाच मांडवात लग्न लागणार  आहे  _ _ _ 



सौ . संगीता ताथोड 








    

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू