पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता

विषय....,,"हा सागरी किनारा"


तोच हा सागरी किनारा 

जेथे  आपण  भेटलेलो 

नयनात   एकमेकांच्या

बघताना      हरवलेलो


निरागस   प्रेम   असेच 

राहो मनाच्या गाभाऱ्यात 

तुझीच  मूर्ती   ठेवलेली 

नेहमी   माझ्या   हृदयात 


दूर जाता  वाटे  हवासा

मनाचे काही बोलायला 

मनातले  दुःख  सांगून 

वाट  मिळते  जगायला


तुझ्यासारखा सोबती हवा 

भर भरून  सुख  देणारा 

मला  कधी  न   रडवता 

पुढील   वाटेवर   नेणारा


प्रण  आज  हा  करायचा 

नाही   अबोला   धरायचा 

रुसवा  फुगवा    आपण 

कधीच   नाही   ठेवायचा 



साथ  हवी   तुझी  नेहमी

एवढे  कर  माझ्या  साठी 

आयुष्यभर   ठेवीन   मी 

प्रेम  माझे  तुझ्याच  साठी 


सौ. रेखा अडसुळे 





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू