कविता
"दोन शब्दांची कविता "
शिर्षक... प्रेम
प्रेम मधुर
सुंदर गाणे
सुरात गावे
गोड तराणे
प्रेम वाहतो
अनंत रंगात
जणू कोकिळा
मंजुळ स्वरात
प्रेम चंचल
स्मित हास
गोड मिठीतला
सुंदर प्रवास
प्रेमात असते
आभाळाची माया
गहिऱ्या डोळ्यात
उन्हातही छाया
प्रेम असावे
दोघांच्या मनात
जशी हिरवळ
वना रानात
प्रेमाचे सौंदर्य
बहरत राहावे
मन मंदिरात
जपून ठेवावे
प्रेमाला असावी
गोड परिभाषा
प्रत्येक क्षणास
ठेवावी आशा
प्रेमाचा गंध
अनमोल ठेवा
नेहमी राहो
हृदयात देवा
सौ .रेखा अडसुळे
जालना