पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांची प्रकाशित पुस्तके

मनोज्ञा

खरं तर एक वय असं असतं की, तेव्हा बहुतेक माणसं कवी किंवा कवियत्री असतात. त्या वयात कविता होत जातात. त्यात निर्व्याजता असते. त्या वयातील ही सवय आयुष्यभर जपली, की कविता अकृत्रिम होतात. या काव्यसंग्रहातील अधिकाधिक कविता या अर्थाने अकृत्रिम आहेत. विशुद्ध प्रेम, मैत्री, अनुराग, स्नेह अशा भाव तरंगांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कविता आहेत. या कवितेत ओढून ताणून आणलेले यमक नाहीत. तंत्र प्रधानता नाही. या कवितेत मनाचं प्राधान्य आहे. ही कविता बुद्धीच्या फुटपट्टीने नव्हे, तर मनाने छान आस्वाद घेण्यासाठी आहे. म्हणून तर या काव्यसंग्रहाला मनोज्ञा असे अभिधान दिले आहे.

  https://shopizen.in/book-details?id=NjA0NDg=  

 

Reflection Of Values In Raghuvansham

To study which moral values were accepted in our ancient society, We’ve to study our ancient literature. Sanskrit literature is one of the ancient literatures in the world. Kalidasa is the greatest poet in the world. He is known as Indian Shakespeare. So, it becomes important to study his devotion in the field of value-education.

   https://shopizen.in/book-details?id=NjA0NDc=

 

चंद्रामृत
भाग १ व २


चंद्रामृत भाग १ व २ ही पुस्तकं आपल्या हाती देताना आनंदाची अनुभूती येत आहे. अनेक ठिकाणी व्याख्यान प्रवचन वृत्तपत्र लेख आदि निमित्तेकरून विविध विषयांवर चिंतन मांडण्याची संधी मिळते. मात्र अशा व्याख्यानांची लिखित टिपणं तयार करण्याची सवय मला नव्हती. मी वक्ता म्हणून चिंतन मांडतो. अनेकदा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पासून उपस्थित सर्व त्यांचे अभिप्राय देतात. आणि त्या संभाषणाची परिपूर्ती होते. असा प्रघात अनेक वर्षेसुरु आहे. मात्र या प्रवचन किंवा व्याख्यानांच्या निवडक विषयांचे लेख असावेत आणि त्या लेखांचा संग्रह असावा, जेणेकरून हे चिंतन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल, यासाठी हा लेखन-प्रपंच!
चंद्रामृत भाग १ https://shopizen.in/book-details?id=NTg2MzM=

चंद्रामृत भाग २ https://shopizen.in/book-details?id=NTkzMDQ=
 

नीतिशतक निरुपण

नीतिशतक निरुपण हा ग्रंथ प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, नीति-साहित्याचे अभ्यासक, संस्कृत साहित्याचे अभ्यासक यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे. या ग्रंथात डॉ. चंद्रहास शास्त्री यांनी संस्कृत कवी भर्तृहरीविरचित नीतिशतकातील श्लोकांचे निरूपण प्रतिपादन केले  आहे. संस्कृत श्लोक आणि त्याचे मराठी निरूपण असे स्वरूप या पुस्तकाचे आहे.
https://shopizen.in/book-details?id=NTAyNzU=  
 
 
श्रीरेणुकाशरणम्                 
श्रीरेणुकामातेची हृद्य स्तुती डॉ. चंद्रहास शास्त्रींनी विविध छंदांत १०० हून अधिक संस्कृत श्लोकांत केली आहे. संस्कृतात आधुनिक काळात देखील सृजनात्मक लेखन झाले पाहिजे, या भूमिकेतून भक्तीरसोत्कट अशी ही रचना प्रस्तुती शास्त्रीजींनी केली आहे. संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तसेच या पुस्तकात श्रीरेणुकामातेला उद्देशून असलेल्या शास्त्रीजींच्या भक्तीरसप्रधान मराठी राचानांचाही समावेश करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या पुस्तकाला सुप्रसिद्ध निरूपणकार श्री. विवेकजी घळसासी यांचे शब्दकुसुमांच्या रूपात अतिशय सुंदर असे आशीर्वचन लाभले आहे.  
https://shopizen.in/book-details?id=NDg4NjA=    

 

सार्थ श्रीदेवीस्तोत्रे
शक्ती उपासनेची एक समृद्ध परंपरा भारतवर्षाला लाभलेली आहे. अगदी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही श्रीदेवीच्या नितांत सुंदर स्तोत्रांची रचना आपल्याला आढळते. सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या घराण्याला श्रीदेवीभक्तीची थोर परंपरा लाभली आहे. डॉ. शास्त्रीजींनी संकलित आणि अनुवादित केलेल्या नित्यपाठासाठी (मराठी अर्थासह) श्रीदेवीस्तोत्रे हे पुस्तक नवरात्री उत्सवाच्या मंगल समयी प्रकाशित करताना आम्हाला एका आध्यात्मिक आनंदाची अनुभूती होत आहे. असे मन्तव्य शॉपिज़न प्रकाशनाने या पुस्तकाविषयी अभिव्यक्त केले आहे.
https://shopizen.in/book-details?id=NDE5MzU=

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू