पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वसंत ऋतु

वसंत ऋतू


चंद्रिकांचा, तो गराडा

अन् पौर्णिमेचे, चांदणे,

सोबतीस ती, धुंद प्रिया

अन् खुशीतले, ते बोलणे!


चंद्र शोभतो नभी हा

सम्राट जणुकुणी विहरतो,

अवनीवरी जणु पहा ना

ऋतु वसंत, तो फुलतो।


रात येई तेजाळुन आणिक

दूध आटीव, मस्त ते

सोबतीला, उभय असता

काय आम्हा,ते ऊणे?


क्षिरपात्र घेऊनी करी, ती

रंभा ऊभी, कि ऊर्वशी,

मुदित मन हे, सांगते तिचिया

अंतरातली ती खुशी।


मधुरदुग्धे,मुदित झालो

सोबतीला ते पकोडे,

स्वर्ग अवतरे भूमीवरी

त्यात ते रम्य मुखडे।


क्षिर प्राशु, वा खाऊ मेवा

संभ्रमात, मी सापडे,

चंद्र होता साक्षीला अन्

मोदधुंदी त्यातुनी जडे।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू