पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राम राम

|| राम राम ||

रचना- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर 


राम राम राम राम, राम राम राम राम 

नाम घेता जळे पाप, नाम जाळी क्रोध काम 


सीता घेई राम नाम, कपी घेई राम नाम 

शिव ध्याती राम नाम, बंधु घेती राम नाम 


घेता राम नाम सख्या, जीवे मिटे येणे जाणे 

राम नाम धरी मनी, राम स्मरी सदा मने 


राम नाम मुखी येई, वाणी त्याची शुद्ध होई 

राम नाम स्मरे सदा, त्याचे चित्त शुद्ध होई

 

राम मूर्ती पूजे नित्य, त्याची काया शुद्ध होई

एक होय जीव शिव, सुखी जन्म खरा होई


***या कवितेत सर्व शब्द दोन अक्षरांचे आहेत.***

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू