पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

।। नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।। डॉ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर

।। नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।।

(वृत्त: भुजंगप्रयात)

कवी: डॉ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर

 

इथे थोर राजे तसे थोर संत

सुभक्ती सुशक्ती निराळीच माती ।

इथे आसमंती निनादे मृदंग

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।।

 

इथे ज्ञान विज्ञानरूपी पताका

इथे दिव्य ओव्या नि गाथा नि दिंड्या । 

इथे पेटती संक्रमाच्या मशाली

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।।

 

इथे देव जाते दळायास येई

इथे देव पाणी भरायास येई ।

इथे देव लेकूरवाळाचि होई

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।।

 

मराठीत बोला मराठीस वंदा

मनी मान ठेवा भगव्या ध्वजाचा ।

कवी चंद्रहासां सदा वंद्य माता

नमस्कार माझा महाराष्ट्रभूला ।।

 

कवी: डॉ. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू