पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लव्ह कम अरेंज

अकेलेपन का सुकून 

 धीरे धीरे से

अच्छा लगता हैं,

समझ आता हैं,

अकेला हू पर अब

खुश हु ,

डर कर नौका

पार नहीं होती हैं,

आगे बढे रहना होता है..

क्यूकी हर अंत

एक छोटीशी नयी शुरुवात 

का कारण होता है...!!


नेहमी प्रमाणे आपल्या शब्दांची गुंफण घालत रजानिने तिच्या डायरी मध्ये लिहून तिने आपले मन मोकळं केलं.


आज समीर आणि रजनी पहिल्यांदाच भेटणार होते. रजनी एका शोट्यशा फर्म मध्ये डीझाईनर म्हणून कार्यरत होती. स्वतः तिने कामात खूप गुंतवून टाकले होते. भूतकाळाला विसण्याचं हेच एकमेव साधन तिने स्वीकारले. तिचा घरच्यांनी खूप समजूत काढल्यानंतर आज ती एका मुलाला भेटणार होती.



बराच वेळ झाला का तुम्हाला इथे येऊन..? तिने स्वतःला सावरत भेटायला आलेल्या समीरला सहजच विचारले...



नाही ..बस आताच पोहोचलो मी सुद्धा...!



जागा ठीक आहे ना... ?दोघांचा ऑफिस पासून जवळ पडेल म्हणून सुचविल मी.. आवडल का तुम्हाला...?



ठीक आहे...समीर हळूच म्हणाला....



लवकर निघाले आज मी ऑफिस मधून... नाही तर हा पुण्याचा ट्राफिक... कंटाळा येऊन जातो घरी पोहोचे पर्यंत...



पुरे पुरे... पुण ते सोन बरं का.! समीर हसतच म्हणाला...



रजनीने पण हसतच म्हणतं..."सॉरी सॉरी..."मी पण इकडलेच बर का..!



सॉफ्टवेअर इंजिनिअर ना तुम्ही...? रजनीने विचारले...



हो, सात वर्ष झाले एकाच कंपनी मध्ये काम करतो आहे. प्रमोशन मिळत गेलं मग इथेच थांबलो. तुम्ही डीसाईनर ना..?



हो..गेली दोन वर्षे झाले पुण्यात आली आहे. सगळं शिक्षण मुंबईतच झालं...



दोन अनोळखी अजून एकमेकांनाशी काय बोलणार ह्याच विचारात दोघेजण होते. एका मॅरेज ब्युरो मध्ये दोघांची नाव नोंदविली होती. तिथे लग्न जुळवणारी रजणीचीच मैत्रीण...एकदा भेटायला काय हरकत आहे ? म्हणून तिथूनच चौकशी करुन आज ती दोघे भेटली होती.

 दुसरोंकी खुशी में खुश रहना ,

गम को  छूपाना,

दर्द से दोस्ती करना,

चांद तारोंसे बाते करना,

तकदिर के पन्नो में खुश रहना...!



समीरने जरा संवादाला सुरवात करत विचारले.."काय आवडतं तुम्हाला तुमच्या रिकाम्या वेळात करायला...?



काय सांगू ह्याला..खरा खुरा छंद सांगितला तर खूप हसून देईल मला हा... मला वाचायला आवडत...! समीरला तिने उत्तर दिले... आता फक्त पुस्तकांची नवे नको विचारायला ह्याने...( रजनी मनातच म्हणाली...)



अरे वा... कुठली पुस्तक वाचता तुम्ही...? समीरने परत विचारले...कादंबरी, ललित लेखन...??



मी सगळीच पुस्तके वाचते.. रजनीने पटकन सांगून टाकलं...



खोटं बोलणं जमत नाही तिला ,हे चांगलंच माहिती होत तिला.. पण तरीही.. तिने प्रयत्न केला आणि ...त्यात ती तिचीच तारांबळ उडाली...विषय बदलायचा म्हणून काहीतरी ऑर्डर देऊ का?..म्हणून विषय बदलला...



मला बटर वडा पाव..तुम्हाला...



मला पुणेरी मिसळ चालेल... समीर म्हणाला...



वेटरला ऑर्डर देऊन दिघेही एकमेकांना बघतच होती...



समीरने परत पुस्तकाचा विषय काढला... काय आवडतं वाचायला तुम्हाला...?

खरं सांगू का , मला ना खूप पुस्तक वाचायला आवडतंच नाही..अर्धं खोटं बोलले मी...!मी फक्त लव्ह स्टोरी वाचते...मला लहान मुलांशी खेळायला खूप आवडतं.. ऑफिस मधुन येते तेव्हा मुलं खेळत असतात, तेव्हा त्यांचात जाऊन खेळलं की मज्जा येते फार...त्या निरागस, इवल्याशा चेहऱ्यावर किती खरा आनंद असतो ना...तोच आवडतो मला.मनातलं साचलेलं दुःख कमी झाल्या सारखं वाटत...

समीरला जरा मनातच हसू आले. पण काहीही न बोलतं त्याची नजर रजनीचा चेहरऱ्यावरुन बाजूला सरतच नव्हती. खूप एकाग्र होऊन तिचे बोलणे तो ऐकत होता.....अरे जरा थांबा तर तुमची ट्रेन तर सुपर फास्ट आहे...

म्हणतात ना...रेशीमगाठी ह्या देवच आपल्या समोर आणून ठेवत असतो...आणि बघा आज तूम्ही माझा समोर आहात... समीर म्हणाला...

म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते...?रजनी प्राश्नार्थक नजरेने बघत म्हणाली...

 तुम कहो न कहो

वो कहती हैं..

तुम्हारे सवाल का जवाब

तुम्हारा हर एक दर्द

तुम्हारा हर शब्द का एहसास

दो पल का सुकून

जुदाई का गम...

इंतजार की घड़ी

जिंदगी में खुशी

सब कुछ दिखता है तुम्हारी आखों में...


मनातल्या भावना सहजच ओठावर येत होत्या अगदी तिच्या शायरी तून...!

तुम्ही खूप गोड आहात. तुमच्या मनातलं खरेपणा तुमचा चेहरऱ्यावर साफ दिसून येतो. तुमचं हसणं, बोलणं, स्वतः सावरण मला त्याच क्षणी तुमचा प्रेमात पडून गेलं. फस्ट साईट ऑफ लव्ह म्हंटल तरी चालेल.....!मी तुम्हाला तुमचा आई सोबत मॅरेज ब्युरो मध्ये आल्या ना तेव्हाच पाहिलं होत...खूप आवडल्या होत्या तुम्ही मला त्याक्षणी. त्या दिवशी तुमचा बद्दल खूप वेळा माहिती विचारूनही मला त्या ऑफिसचा लोकांनी काहीच सांगितले नाही आणि योग्य वेळ येईल तेव्हाच सांगू म्हणून मला सांगितले. त्या दिवसा पासून मी अगदी आतुरतेने तुमची वाट पाहत होतो....

रजनी फक्त ऐकत होती. त्याला मध्येच थांबवत मला काही सांगायचं आहे असे म्हंटल... माझा डिवोस झाला आहे.

त्याचा चेहल्यावरचे हावभाव लगेचच बदलले ....

कॉलेजला असताना त्याची ओळख झाली. तो मला खूप आवडायचा. कधी त्याचा प्रेमात पडली कळलंच नाही. घरी विरोध होता आमचा लग्नाला म्हणून आम्ही लपून रजिस्टर मॅरेज केलं आणि मुंबईत राहू लागलो. दोघांनाही नोकरी मिळाली.पण हळूहळू मला त्याचा मुखवट्या मागचा चेहरा दिसला. त्याला माझे नोकरी करणे आवडायचे नाही, कारण मी त्याचा पेक्षा जास्त चांगल्या कंपनीत कामाला होते. माझा प्रेमाची किंमत तो पैशात मोजू लागला. पण एक वेळ येते ना जेव्हा तुमचा प्रेमवरचा विश्वास उठून जातो आणि मग सगळंच विस्कटून जात तसच झालं माझ्यासोबत सुद्धा. तो एकदिवस रात्री एका दुसऱ्याच मुलीला घेऊन घरी आला आणि त्या क्षणी मी त्याला सोडले. तीने पेललेले ते दुःख तिचा पाणावलेल्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते.

मन खायला उठेल अशी भयान शांतता होती त्यावेळी दोघांमध्येही ही...!

 कुछ रिश्ते अपनेपन से अनजान समजे जाते हैं 

वहाँ बदल जाना चाहिए 

बात अपने आत्मसन्मान पर आए 

ज़रूरी नहीं हर बार उसे 

बिना कुछ शिकायत के निभाए !

अंदर ही अंदर घुटने के बजाय 

उस रिश्ते से निकल जाना बेहतर 

हर सवाल जवाब तुमसे ही पूछा जाए 

क्यूँ हर बार ख़ुद को ही सजा सुनाई जाए..?


ती सहजच बोलून गेली....!

"प्लीज रडू नको..." त्याचा चेहरा उतरला होता.

"मला माहिती आहे, हे ऐकून तुमचा नकारच असणार, पण आता मला त्याची सवयच झाली आहे. मला तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही म्हणून सगळे आधीच सांगून दिले."

"तू अशीच आहेस का???"

"म्हणजे...?"

"समोरचा काही सांगायचा आधीच स्वतः बद्दल निर्णय घेऊन टाकलेस...? माझा बद्दल पण ऐकून घे..." रजनी जरा शांत झाली...

"मी सुध्दा लव्ह मॅरेज केलं होत. माझ्याच कंपनीत होती ती. वर्षभरात मैत्री, मग प्रेम आणि मग आयुष्य भर सोबत राहण्याचा निर्णय....सगळं एकदम छानच चाललं होत. पण एकदिवस अचानक तिने मला येऊन सांगितले मला तुझ्याशी जमवून घेणं फार कठीण जातंय ... मला हे बांधलेलं नातं नको. मग काय हृदयावर दगड ठेवून तिला सोड चिठी दिली."

प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा वेगवेगळी असू शकते. प्रेम मागून मिळत नसत , ते सहजच होत असत. प्रेम होत तेव्हा सांगून होत नाही ते होऊन जात बस...काहींना एकच वेळा होत, तर काहींना बरेचदा होत... पण खरं प्रेम मात्र चिरकाल हृदयाचा कोपऱ्यात दाटलेले असतं...

"बरोबर ना...?!"

रजणीची स्तब्ध नजर फक्त समिरलाच बघत होती. जणू काही तिचा मनातलं कोणीतरी बोलून गेलं. त्या सुंदर प्रवाहात ती वाहतच जात होती...

 पीछे छूट गए थे 

फैसले लेने में 

जाने क्यों भटकते थे?

दिल टूटा था जब 

भरोसा नहीं था 

सब कुछ बिखरने से 

सबका साथ छुटा था..।

अब ना बहकावे आकर 

मोहब्बत दुबारा न करुँगी 

यू तो समझदार हू 

अब न किसीसे डरुंगी...!


हॅलो.... हॅलो.... समीरने हात दाखवत तिला भानावर आणले...अगं ऑर्डर आली आहे...

हम्म...क्षणातच तिने तिची नजर दुसरीकडे वळवली....प्रेम... मला वाटलं होत प्रेम फक्त एकदाच होत. मग मी जेव्हा प्रेम केलं ते बालिश होत का?? कुठे कमी पडले मी माझ्या कडून..? मला कळलेच नाही, आणि अर्ध्यावाटेवर त्याने मला सोडून दिले. समीर अगदी विव्हलीत होऊन तिला ऐकत होता.

कोणीतरी आपलंच आपल्या मन बोलतं करतय असं त्याला वाटत होते...

काही वेळेची ती शांतता सुध्दा त्या दोघांमध्ये एकमेकांचा संवाद घडवीत होती. तुम्ही बरोबर च म्हणतं.. प्रेम होऊन जात, ते कोणी थांबून ठेऊ शकत नाही. आपण फक्त आपल्या प्रेमळ माणसांना ओळखू शकलो नाही हीच गफलत झाली....नको नको ते ऐकले मी, आता परत त्या जखमा झाल्यातर सहन करण्याची ताकद नाही माझ्यात...! आणि अश्रूंचा धाराच लागल्या तिचा डोळ्याला...सगळा भूतकाळ समोर येऊन उभा झाला होता...

"बघ, भूतकाळात रमत बसशील तर तुझा वर्तमान आणि भविष्यात कसे आनंदी होईल. त्या लहान मुलांमध्ये बागडून तुला आनंद मिळतो, तशीच परत एकदा संधी स्वतःला पण दे..."

त्याचं बोलणं, समजावून सांगणं सगळं अगदी रजनीला परत प्रेमात पडायला विवश होईल असं होत. तुम्ही फार चांगले आहात, पण....

एक सांगू... प्रेम करायला काळ,वेळ नाही तर सहजच घडलेल्या संवादाने सुध्दा आपण त्या व्यक्तीचा प्रेमात पडू शकतो. मला तू माझी जीवणसांगिनी म्हणून माझ्या आयुष्यात हवी आहे. मला तू हवी आहेस. मी तुला इतकं प्रेम देईल की तुझा भूतकाळ तुला कधीही आठवू देणार नाही .तुझा विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही मी...

काही क्षणांचा संवादात तिला तो आपलासा वाटत होता. तो जे काही बोलत होता ते अगदी मानापासून बोलत होता हे कळत होत तिला... माझ्या सारख्या मुलीला किती सहजतेने जिंकलं त्याने...नवीन इंद्रधनुचे रंग जीवनात परत एकदा भरायला काय हरकत आहे , हे किती सहजतेने त्याने पटवून दिले.


 मोहोबत हैं तुमे से, हमेशा रहेगी

तुमसे बिना किसी उमिद के

ये इबादत रहेगी..!

मुझे तुम मिल जाओ

ये खवाईश तो रहेगी,

हमारा मिलन जबरदस्ती नहीं

एक दुसरे की जरुरत रहेगी..!


परत एकदा आपल्या शायरी तून रजनी पटकन् बोलून गेली.

तुम्ही खूप वेगळे आहात....पण...

मला तुझा-माझा आयुष्यात परत एकदा नवीन रंग भरण्यास संधी देशील ना...???

आपलसं वाटणारा तो, त्याला नाही का म्हणू , असा विचार करत होती...रजनी...

मी उत्तराची वाट बघतो आहे, रजनी....

तिचा होकार आहे हे तिचा डोळ्यात दिसत होते पण शब्दात तिला मांडता येत नव्हते.

मला तुझी जीवनसाथी म्हणून व्हायला खूप आवडेल. मी देवाचे खूप आभार मांडते की त्याने ह्या जीवनाचा प्रवासात तुझी गाठ माझ्याशी घालून दिली. मला जगायचं आहे परत एकदा मनापासून, खूप हसायचं आहे ,जीवनाचा प्रवास आनंदाने करायचा आहे. पण हे सगळं आता तुझ्याच सोबत....! रजनीचा डोळे भरुन आले....

रजनीचा हात हातात घेत त्याने तिला सावरले. आज दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा एकमेकांबद्दलचा विश्वास त्यांचा डोळ्यात दिसत होता. एका नवीन कोऱ्या वहीत आपले रंग भरायला दोघेही सज्ज झाले होते आता....!

 जिसे अपना मानते हो,

उसका दिल ना टूटे।

रिष्टे तो बहोत बनते हैं

इस रंग भरी दुनिया में,

पर

जो तुमपर भरोसा करता हैं

उसका कभी दिल ना टूटे...!


नेहा खेडकर, अहमदाबाद.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू