पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या मराठीची बोलू कौतुके

पुस्तक आढावा

पुस्तकाचे नाव - माझ्या मराठीची बोलू कौतुके
लेखक-लेखिका - शॉपिजनवरील नवोदित सर्वोत्तम लेख लिहिलेले संकलक व संपादक - ऋचा दीपक कर्पे
प्रकाशक - शॉपिजन 

वेब-www.shopizen.in/marathi
एकूण पाने - 65
मोबाईल - 9926576455
किंमत  -227 रू.

           परवा संध्याकाळीच मला हे पुस्तक डिलीवरी बॉयने दिले. त्यावेळेसच ठरवलं की, हे आता दोन दिवसातच वाचून संपवायचं आणि तसंच केलं. नवोदित साहित्यिकांसाठी झटणारी, मदत करणारी, त्यांना संधी देणारी एकमेव संस्था म्हणजे शॉपिजन. सुरुवातीला मी लेखक/ कवी झाल्यानंतर वाटायचं की, आपले साहित्य कोण प्रकाशित करेल? इकडे या क्षेत्रात तर बऱ्याच प्रकाशकांनी बाजार मांडला आहे, पण अजूनही एक रुपया देखील न घेता तुमचे पुस्तक छापणारी एकमेव संस्था म्हणजे शाॅपिजन. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार जेंव्हा तुमची इच्छाशक्ती उत्कट असते तेंव्हा तुम्हाला ते जरूर मिळते. त्याप्रमाणे मला एका फेसबुक ग्रुपवर शॉपिजनची जाहिरात पाहिली, त्यानंतर त्यांच्याशी नाळ जुळली. माझं भरपूर साहित्य शॉपिजनवर मोफत उपलब्ध आहे-एक बहुभाषिक कवी, लेखक म्हणून- मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून. असो !
             पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय छान असून त्यात महाराष्ट्राचा नकाशा दाखवून त्यात आपले छत्रपती शिवराय यांचा पुतळा दिसतो तसेच बाजूला वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे रंगीत छायाचित्र दिसते. अतिशय उत्कृष्ठ छपाई, अक्षरांची सुटसुटीत रचना (फॉन्ट) आहे.
     मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शॉपिजनने लेख आमंत्रित केले होते, त्यातील सर्वोत्तम 15 लेखांची  निवड म्हणजेच हे पुस्तक. या पुस्तकासाठी नागेश शेवाळकर सर, पुणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. नवोदित लेखक/ लेखिका देखील सर्वोत्तम लिहू शकतात याचीच पोहोचपावती म्हणजेच हे पुस्तक आहे. 'आजच्या काळात मराठी भाषेचे महत्व व तिच्या संवर्धनासाठी उपाय' या विषयावर वेगवेगळ्या नवोदित लेखक/लेखिका यांनी लिहिलेले, शॉपिजनने निवडलेले सर्वोत्तम लेख आहेत. या निवडलेल्या लेखसंग्रहाला "लघु शोध निबंध" देखील म्हटले तर वावगे ठरणार नाही. या लेखसंग्रहासाठी शॉपिजनने  माझ्या लेखाचा अंतर्भाव केला, त्याबद्दल मी शॉपिजन टीमचे मनःपूर्वक आभार मानतो.
             मग वाचाच- मराठी भाषेचा महिमा सांगणारे, नवोदित साहित्यिकांनी लिहिलेले, शॉपिजनने काढलेले हे पुस्तक. 
©®- विश्वेश्वर कबाडे (नवोदित बहुभाषिक कवी, लेखक) अणदूर, ता. तुळजापूर
भ्रमणध्वनी- 9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू