पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवकायी पाऊस

अवकायी पाऊस


वाट लावली पाण्यान

अवकाळी येऊनिया

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


सार्‍याच्या मनी रं बद्दी

तुव्हा बी तेच केल या

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


वायल्या कापसावर

गारपिट आणल या

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


बिना रं बलावल्यान

तू पावना बनलाया

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


फाशिचा दोर तुव्हा

कसा पुन्हा गुफलाया

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


अमदाच्या रं सालाच 

बजट ढासळलं या

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


संसाराचा माह्या कसा

बट्याबोळ रं केला या

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


रायला ना वाली कोणी

हे जहर पाजल या

रायल-सुयल पिकं

मातीमोल रं झालं या


सौ. छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू