पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवकाळी बरसती जलधारा

अवकाळी बरसती जलधारा
अवेळी सुरू झाला पावसाळा
कसे अवचित येणे झाले तुझे
हाची संभ्रम आम्हाला पडला
सोन्याची कणसे उभारली होती
बळीराजा च्या कष्टांनी
धन-धान्य मोती हातात येतां
पुन्हा विखुरले अवती भवती
क्षण क्षण आशेचा असतो
बीज अंकुरित होताना
आनंद कॄषकांना देऊन जातो
जणू पुन्हा बाप होण्याचा

कां हे ऋतू चक्र बदलले?
हा दोष आहे कुणाचा?
मानवची दोषी आहे
ह्या प्राकृतिक बदलाला
रान माळा कमी झाला
पर्वत श्रॄंखला झाल्या रित्या
नदीचे पाणी आटले
सागर सरकतो मागे मागे
वाळवंट हे पुढे ठाकले
पाहून मन उदास होते

अतॄप्त लालसा ही मानवाची
पुढील पिढीला पडेल भारी
आतां तरी सावध हो माणसां
समज प्राकृतिक संकेतांना

प्रकॄतिला बहरू दे पुन्हा
आपल्या आनंदा साठी
नको देऊ तिस मूक वेदना
मग न ही येतील अवचित जलधारा
न ही येईल अवेळी पावसाळा.

सौ. स्वाती दांडेकर
इन्दोर
फोन नंबर 9425348807

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू