पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुझ्या हास्य ज्योती

तुझ्या हास्य ज्योती

- हासरा चंद्र ( चंद्रहास सोनपेठकर )


दाटलेल्या गर्द अंधा-या राती
उजळती तुझ्या हास्य ज्योती
भीती काळजी विरून जाती
आशा स्वये पल्लव गीत गाती

सहज तुझे मनोरम हासणे
खुणावते मला पुनश्च जगणे
विसरून तेव्हा मी माझे हारणे
उरते लक्ष्य, एक, हृदय जिंकणे

नभीचे तारांगण तसे सांगते हळुवार
झाडांना, वेलींना, निखिल प्रकृतीला
वसंत पाझरू, बहरू द्या तुम्ही चौफेर
मोहोराचा गंधही असू द्या सोबतीला

उत्कट स्वरसाज लेऊनी गीतिका
समेत प्रकट व्हावी जणु चंद्रिका
वाट ही स्वप्नातील कुसुम वाटिका
त्यावरी मंथर चालतसे शकटिका

त्या क्षणी लाजतो तुझा गजरा
अन् क्षणाचा सण होतो साजरा
चुकवून सा-यांच्या नजरा जरा
गूज सांगती आपुल्या या नजरा

खुलाशाविना जगावे दिलखुलास
युगलगीत ते गावे राग भीमपलास
मनीचे तरंग जणु सागराचे उल्लास
कविता कामिनीचा बहरावा विलास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू