पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवकाळी पाऊस

1.

 

कोसळत्या आसवांना 

बाप पावसाळा म्हणे

 

झिरपतो ढगातून घाम 

त्याला अवकाळी म्हणे

 

सालं, राबणाऱ्याशीच  

फितूर होतेस निसर्गा, 

 

बरसला नाहीस कधीही

त्याला दुष्काळ म्हणे,

 

तर.... 

 

गरज नसताना कोसळले

त्याला अवकाळी म्हणे,

 

2.

 

अवकाळी पावसाने शेतकरी फोडतो टाहो

निसर्गा तूही फासावर लटकवतेस काहो

 

अरे, घामाच्या धाराने 

पिकवला होता मळा 

सावकाराच्या कर्जाने 

बांधला होता तळा 

आस घेऊन जगलो

यंदातरी बांधीन वाडा

 

पण निसर्गा तूही पुढाऱ्यासारखा 

भर उन्हाळ्यात बोंबलतेस काहो

 

अवकाळी पावसाने शेतकरी फोडतो टाहो

 

राबत्या हाताला बळ

हृदयाला आली कळ

बैल वीज पडून मेला

शासनास घालतो गळ

कोण कोणाचा वाली

इथे बेइमानी जाळ

 

मासोळीगत फसतो बळीराजा 

तप्त उन्हातही पावसाची धार काहो

 

अवकाळी पावसाने शेतकरी फोडतो टाहो

 

संजय येरणे.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू