जीवन प्रबंधन
शीर्षक .."जीवन प्रबंधन"
जीवन आहे सुंदर गान
त्यात लावूनी सुर व ताल
ठेवुनी राग लय चा भान
मिळूनी सारे करी धमाल
आहे हा सुवर्ण संधीकाळ
अबोला नका ठेऊ कुणाशी
भरोसा नाहीं जन्म -मृत्यु चा
विचारावे आपल्या मनाशी
निसर्गा कडून पण घ्यावे
जीवन प्रबंधना चे मंत्र
रंगीत गुलाब व शेवंती
देई खुश राहण्याचे तंत्र
असाच हा जीवनाचा खेळ
कधी ऊन व कधी सावली
तोच आनंदी आहे या जगी
ज्यास सुखाची किल्ली गावली
सौ. रेखा अडसुळे