पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हॅलेनटाईन डे

सकाळचे दहा वाजले होते. श्रीयश आॅफिस ला गेला आणि अनन्या शाळेत पण आज मी रजा टाकल्याने अगदी निवांत होते. घर, आॅफिस सर्व जबाबदारी पार पडताना आनंदाचे कित्येक क्षण वेचायचे राहून जातात अशा क्षणांना टिपायला आजचा दिवस अर्थात व्हॅलेन्टाइन डे अन् हो , आज श्रीयश ने ही बाहेर घेऊन जाण्याचे वचन मला आणि लेकीला दिले आहे.

मनात अनेक गुलाबी अन् हळुवार क्षण मोर पिसागत भिरभिरत होते. मस्त पैकी हातात वाफाळलेल्या काॅफी चा मग, त्या वर माझा अन् श्रीयश चा फोटो होता घेत लाॅन मध्ये जगजीत सिंगची गजल ऐकत बसायचा मूड होता.

नमस्कार, मिसेस गडकरी.

नमस्कार देशपांडे काका, कसे आहात ? निघाला आपल्या रोजच्या ड्यूटी ला?

मी छान आहे अन् हो ती माझी ड्यूटी नाही तो आनंद आहे. ते जाऊ द्या पण आज घरी?

हो, आज रजा घेतली आहे. आज व्हॅलेन्टाइन डे आहे नां? डोळ्यात अनेक गुलाबी स्वप्ने रंगवत काकांना सांगत होते आणि हो आज श्रीयश ने बाहेर फिरायला, डिनर ला घेऊन जाणार आहे.
अरे वा, मग आज तर आनंदी आनंद आहे.
हो,

देशपांडे काका आमच्या च काॅलोनी मध्ये राहायचे परंतु त्यांचा पत्ता, घर, घरची माणसे या इतर माहिती काहीच नव्हती आणि तसे जाणून घेण्यासाठी प्रयत्न ही नव्हता फक्त रोज ते ठराविक वेळेला कुठे तरी जातात, हातात एक पिशवी असते हीच माझी माहिती. त्यांच व्यक्तीमत्व, राहाणीमान पाहता ते उच्च पदावरुन निवॄत झाले असावे हा माझा अंदाज. रोज माझी अन् त्यांची निघायची एकच वेळ असल्याने काकाशी छान परिचय झाला होता.

त्याच्या शिस्तबद्ध जीवनाचे मला खूप कौतुक वाटायचे, तसे मी घरी बोलले की श्रीयश मला नेहमी चिडवतो "काय म्हणतात तुझे देशपांडे काका?"

"अरे काय हे, ते आपल्या वडिलांच्या जागी आहेत."

"साॅरी, साॅरी, अग मी लेट लतीफ मनुष्य आहे. Attendance Register मध्ये Red Mark नसले तर मजाच येत नाही. ते जणू कंपनी मध्ये आपले विशिष्ट स्थान दर्शवतात."

"तुझं पण ना काही तरी च असते." तरी ही काकांचा नित्यनियम माझ्या कुतूहलाचा विषय होता.

काकांच्या हाके ने मी वर्तमानात आले.

माफ करा, तुम्हाला त्रास देत आहे. प्रश्नार्थक नजरेनं मी वर पाहिले.
तुम्ही आत्ता म्हणाला ना आज तो व्हॅलेटाइन डे आहे म्हणून.
माझी प्रश्नार्थक नजर अद्याप तशीच होती. व्हॅलेन्टाइन डे चा ह्यांच्या शी काय सम्बन्ध? अन् हे काय वय आहे ह्याचे? मी पण ना उगाच प्रत्येकाशी मन मोकळे बोलत असते. मला अजूनही ते प्रॅक्टिकल होता येत नाही आणि ना ही ती प्रायव्हसी जपता येते.

If you don't mind तुम्ही माझ्या सोबत शाॅपिंग ला येऊ शकाल? एरवी मी एकटा ही गेलो असतो पण आज तुमचा तो खास दिवस आहे नां त्या साठी खास खरेदी करावी म्हणून, काही त्रास असल्यास निसंकोच सांगा मला काही वाईट वाटणार नाही.

आता वाईट काय अन् चांगले काय? "आलीया भोगासी असावे सादर" . वयाने माझ्या वडिलांच्या जागी, जावे की नाही? , ह्यांच्या घरी अजून कोणी नाही कां ?
वयाचा मान ठेवत मी हो म्हणाले. काय त्यात मी तशी मोकळीच होते . तेव्हढाच बाहेर फेर फटका.

"हो ,चलते मी सोबत, फक्त मुलगी येण्या आधी यावे लागेल येवढेच."
"हो, हो"
"बसा काका, आलेच. गाडीने जाऊ या म्हणजे वेळेत येता येईल"

"हो, मला एक चांगला गाऊन, हार्ट शेप पेंडल, बुके, केक आणि डेकोरेशन चे सामान घ्यायचे आहे. आधी एटीएम मधून पैसे काढून घेऊया. आजचा काही decided program नव्हता नां"

"काय बाई ह्या वयात पण? उगाचच आले मी, माझे हे प्रताप श्रीयश ला कळले तर? कल्पना न केलेलीच बरी."

गाडी एटीएम समोर पार्क करून शाॅपिंग आणि त्या साठी लागणारा वेळ हे सारे काही माझ्या समोर तोंड वेंगाडत उभे होते. फार आवड आहे नां समाजकार्याची.
चला, हो. मी यंत्रवत काकांच्या आज्ञेचे पालन करत होते.
भारी पैकी गाऊन, महागडे पेंडट आण इतर जय्यत तयारी पाहून मला कुठे तरी त्यांच्या बायको चा हेवा वाटला. काय पण रसिक माणूस हा , नाही तर श्रीयश, साडी तर सोडाच पण साधा गजरा सुध्दा आपल्या मनाने आणला नाही. आम्ही बायका पण नंतर आपल सर्व फर्स्टेशन कोणत्याही जोडप्यावर काढून मोकळे होतो. अद्याप हे सामान घेऊन कुठे जायचे हे अजून ही कोडेच होते.

"धन्यवाद, मिसेस गडकरी."

"It's ok काका." मी हसत हसत म्हणाले अन् पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागले. जीवनाच्या अनुभवांनी माणूस ओळखायला तर शिकले होते. काका स्वभावाने रसिक असले तरी ही परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.
"मी तुम्हाला तुमच्या नावाने संबोधन केले तर चालेल?"

"हो, मी श्रुतिका."

"सिटी हाॅस्पिटल कडे घेता? प्लिज." मनात विचारांचे काहूर माजले होते. काय प्रकार आहे हा. दवाखान्यात?
मी काकांन सोबत एका प्रायव्हेट वार्ड मध्ये दाखल झाले. इतर लोकांच्या वागण्या बोलण्याने काका बर्याच दिवसा पासून इथे येत असावे असा मी अंदाज बांधला.

आत्ता पर्यंत हसतमुख असणारे काका अचानक गंभीर झाले. मला काही सूचत नव्हते न ही समजत होते. हक्काने अधिक परिचय नसलेल्या व्यक्ती सोबत शाॅपिंग .
समोर काॅटवर एक मध्यम वयाची स्त्री निपचित पडली होती. बहुतेक त्यांच्या पत्नी असाव्यात . काकांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला," राधीका, आज फार उशीर झाला नांं? तुला भूक लागली असेल नां? आत्ता नाश्ता देतो हं." असे संवाद साधत, तीन बाऊल मध्ये उपमा घालून मला, स्वतः ला आणि तिसरी काकूं जवळ ठेवली. ते पण त्यांच्या शेजारी बसले. माझी परिस्थिती आत्ता पर्यंत फार अवघड झाली होती. ह्या व्यक्ती चे व्यक्तिमत्त्व रेखाटण्यात मी अक्षम होते.

येवढ्यात नर्स आली. "Hello कसे आहात? आज काही विशेष? इतकी खरेदी?"
"I am fine sister, today is Valentine's Day. Then. माझी इच्छा आहे की ही खोली खूप छान सजवून, राधीका ला उपहार द्यावा, तिला ही छान तैयार करून सर्वानी मस्त पार्टी करावी. सिस्टर तुम्ही मदत कराल?"
"हो, अवश्य."
"आणि सर्वाना सांगाल पण?"
"हो." काकांनी सर्व सामान सिस्टर ला सोपवले.

आत्ता पर्यंत मी पार कोसळले होते. काय चालू आहे हे सकाळ पासून आणि मी? .
शाॅपिंग, दवाखाना, एक चेतना शुन्य व्यक्ती शी सुखद संवाद आणि नंतर पार्टी अन् मी फक्त त्याचा एक साक्षीदार ?
"श्रुतिका,"
मी एकदम भानावर आले.
काका खिडकी तून उतूंग आकाशात दूरवर पाहात गंभीरपणे बोलत होते.
"श्रुतिका, जीवन फार कठीण आहे बेटा. क्षणांक्षणांनी घट्ट बांधलेले जीवन फार अशाश्वत आहे. पुढील क्षणाचा अंदाज कधीही येत नाही तरी ही एका वेड्या आशे मागे धावत असतो. त्या मोहात गुरफटले असतो.
तीस वर्षा पूर्वी राधीका माझ्या जीवनात आली. तिच्या सोबती ने मी जीवनाचे क्षण आनंदाने वेचत, आपल्या स्वप्नांना आकारत ,माझ्या स्वप्न पूर्ती कडे झपाट्याने वाढत होतो अन् ही माझं घर, माझी माणसे, मुलगा ह्यांची काळजी घेत आपली कर्तव्य बीना तक्रार यशस्वी रीत्या पार पाडत होती. तक्रार कधी तिच्या स्वभावातच नव्हती आणि मला ही कधी ते उमगले नाही की पैशाची चमक सारे काही देऊ शकते मान, सन्मान, स्टेट्स, पुतळा, अभिमान पण आत्मीयतेनचे क्षण नाही. काळ सरत होता. उत्तरोत्तर माझी प्रगती यश, किर्ती चे मार्ग प्रशस्त करत होती. मी सिध्दीविनायक कंस्टॢक्शन कंपनी चा मालक झालो. आयुष्य सुखाच्या गुरू किल्ली सारखे चालत होते. सिध्देश पाहता पाहता इंजीनियर झाला आणि माझ्या व्यवसायात पाठिंबा. त्याच्या सोबत सुंदर, हुषार आणि लाघवी त्याची पत्नी मधुरा गॄहलक्ष्मी म्हणून आली आणि घरात जणू नव चैतन्य. एका वर्षात आशान्विता ची चिमुकली पावले घराला लाभली अन् कोणीही ईर्ष्या करावी असे जीवन " सर्व दिले ते ही न मागुन, अजून काय हवे आयुष्या कडून ".
पण जीवन येवढे शाश्वत ही नसते जितकी आपण कल्पना करतो. सिध्देश - मधुरा च्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. नाही नाही म्हणत असताना ही सिध्देश ने आपली बिझनेस टूर कॅन्सल करून पुण्याची फ्लाइट घेतली. विधी लिखित नेहमी अटळ असते, सुखाचा घास घेताना, आयुष्याच्या सरत्या काळात शेवटी मीठाचा खडा लागलाच. एयर क्रॅश मध्ये सिध्देश आम्हाला सोडून गेला आणि त्या आघातामुळे राधीका कायमची अबोल. बहरलेला वॄक्ष क्षणार्धात रिता झाला. मधुरा माझ्या खांद्यावर विसावली, आधारासाठी, विश्वासा साठी, नियतीचा सामना करण्यासाठी. मी स्तब्ध झालो. नियती आपला डाव खेळून चुकली होती. पुढचा डाव माझा होता. सावरण्याचा. मधुरा आम्हा दोघांकडे अन् लेकीची जिम्मेदारी समजून जीवन मार्ग क्रमांयला लागली. दु:खाचे ओझे कितीही जड असले तरी हसून पेलावे च लागते. राधीकाला इथे ठेवून मी पायात बळ नसतानाही परिवार सांभाळण्यासाठी उभा राहिलो. दैवाने दगा दिला तरी देवाने साथ सोडली नाही. माझा बाल मित्र अविनाश मला भेटायला आला. त्याच्या सोबत त्याचा मुलगा अवि पण होता त्याने अमेरिकेतून एम. बी. ए. केले होते. लोभस व्यक्तीमत्वाचा धनी अवि समंजस पण होता, त्याने सद्य परिस्थितीमध्ये माझ्या कंपनीत रूजू होण्याची ईच्छा जाहीर केली आणि नव्याने माझी उमेद जागी झाली. मधुरा पण सावरली होती निदान तस दर्शवत होती. तरी ही मधुरा चं काय ह्या विचाराने अस्वस्थ होत होतो. शेवटी मी तिला दुसऱ्या लग्ना बद्दल विचारले, तिचा नकार अपेक्षित च होता पण बाळ माझ्या नंतर? ती तळमळली. बेटा, अवि कसा वाटतो? तिने प्रश्नर्र्थक नजरेने पाहिले. हो, मी त्याच्या संमती नेच विचारत आहे. मोठ्या कष्टाने मधुरा तयार झाली. जीवनाल पूर्ण विराम नसतो.. मनात असो वा नसो पुढे हे जावेच लागते.
काका दमले होते पण मन मोकळे करत होते..
आज वर्ष झालं. ते दोघे खुष आहे. अविने आशान्विता साठी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. मी रोज इथे येतो. राधीकाला काही अस्तित्व नाही ये तरी ही तिला कधी तरी जाग येईल ह्या आशेवर आजच्या दिवसाला निरोप देतो."
"Uncle, every thing is ready."
"Yes sister."

आम्ही आत गेलो. कुणाच्या ही वैवाहिक जीवनाच्या प्रथम रात्री सारखी सजावट होती आणि काकू ही.

"बाबा," मधुरा नी हसत हसत प्रवेश केला. किती छान. मला सगळ समजय हं. तिच्या खळखळून हसण्याने वातावरण एकदम आनंदी झाले..
"श्रुतिका, मी तुला मुलगी मानले आहे. नातीला आणि जावयांना बोलावून घे नां"
हो, हो मधुरानी ही दुजोरा दिल्याने माझा नाईलाज झाला.

एका अविस्मरणीय भावनिक कार्यक्रमा नंतर दवाखान्यातून माझा पाय निघत नव्हता. कोणत विश्व होत ते, तिथे नवरा बायको चं प्रेम, त्यांचे आदर्श, सुनेला मुलगी मानून वाढवणं, तिचं सासऱ्याला वडीलांच्या जागी मानुन सावरणं अवि चे एका विधवेचा साथीदार होण. जीवनाचे एक वेगळे रुप अनुभवायला मिळाले.

सर्वांना प्रेमाचे उधाण आलेल, तुडुंब भरलेले हाॅटेल, बगीचे परंतु ह्यात आजन्म सोबतच वचन, त्याची साक्ष, पूर्तता, प्रेमाची व्याख्या, त्यागाची परिसीमा माहीत होती कां? की फक्त दिवसाची पूर्तता या निव्वळ टाईम पास.

मी श्रीयशच्या खांद्यावर विसावले. प्रेमाची साक्ष, त्याला निभवायच वचन, सातारा जन्माची प्रेयसी, पत्नी, अन. सखी सोबती म्हणून.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू