पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी प्रेम कथा

 

 
                  लहान बहिणीच्या मैत्रिणीच्या घोळक्यात "ती "वेगळीच दिसत होती. नवीन आली असावी. कारण बहिणीच्या सर्व मैत्रिणींला मी नावासकट ओळखत होतो पण "ती "सर्वात वेगळी, स्वतः कडे लक्ष वेधून घेणारी होती.
 उंच, सड पातळ, गोरा पान रंग, काळेभोर लांब 
केस, गडद जांभळ्या निळ्या रंगाचा कडक इस्त्री चा स्कर्ट, त्यावर पांढरा शुभ्र झालरीचा टॉप, तिच्या डोळ्याचा रंग मात्र मला दिसला नाही.
     बहुतेक परीक्षेच्या पूर्व तयारी बद्दल चर्चा करत असावी.
मी एक नजर टाकून माझ्या अभ्यासाला लागलो
नंतर अभ्यासाच्या व्यस्ततेत विसरून देखील गेलो.
     पंधरा दिवसाने परत माझ्या बहिणी सोबत दिसली, थोडी उदास,टेन्शन मध्ये होती.
बहुतेक केमिस्ट्री चा पेपर कठीण होता.
मला पाहताच माझी बहीण माझ्या जवळ आली, बरोबर "ती "होतीच!!
रसायन शास्त्राच्या पेपर विषयी चर्चा करताना तिच्या घाऱ्या डोळ्यांची नजर थेट माझ्या हृदयात शिरली व माझ्या हृदयाचे अक्षरशः H2O, H2O झाले व त्याच क्षणी मी आपले हृदय तिला देऊन टाकले!
   पुढें माझ्या बहिणी सोबत"ती "मलाअनेकदा दिसायची,कधी पंजाबी ड्रेस मध्ये तर कधी गुढग्या पर्यन्त लांब फ्रॉक मध्ये!!
         पंजाबी ड्रेसची गुलाबी ओढणी तिच्या ओठांच्या रंगाशी स्पर्धा करत असे तर कधी तिचा काळा लांब झगा तिच्या केसांमध्ये अडकलेला वाटे!!मी मात्र पूर्ण पणे तिच्यात अडकलो होतो पण हे एकतर्फी प्रेम दुतर्फी कसे होणार??
त्याच वेळेस माझे बाबा नोकरीतून सेवा निवृत्त
झाले व त्यांनी भोपाळ सोडले. माझे इंजिनीरिंग चे सहा महीने राहिले होते, मग वडिलांने त्यांच्या दूरच्या नात्यातील भावा कडे माझी राहण्याची सोय केली, मला काहीच कल्पना नव्हती पण दार उघडल्यावर "तिला "समोर बघून मला काय वाटलें हे शब्दात सांगणे फार कठीण होते
व मग सुरू झाला आमच्या प्रेमाचा लपंडाव!!!
  उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या भावंडांबरोबर पत्ते खेळायचे किंवा रात्री काका काकूं सोबत आईस क्रीम पार्टी करायची, अर्थात ह्या सर्वात "ती "असायचीच!!
शांत, निरागस ओठ घट्ट शिवलेले, काहीच बोलायची नाही पण तिचे गहिरे घारे डोळे मात्र तिच्या मनातील सर्व बोलून द्यायचे!
   कधी वाटायचे कि "ती "आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत आहें, मन आनंदाच्या हिंदोळ्यावर उंच उंच झोके घ्यायचे तर कधी त्याच उंचावरून धपकन खाली पडायचो, पण ह्या सर्वात काकूंशी मात्र छान गट्टी जमली होती व हीच गट्टी आमच्या प्रेमाला पुढें नेईल अशी आशा मनात बाळगून होतो.
        तर अशी ही माझी एक तर्फी प्रेम कथा होती व प्रेम कथा म्हटली म्हणजे खल नायक कथेत येणारच नां??
       त्याच वेळेस माझी कानपुर I. I. T. मध्ये, Mtech साठी निवड झाली.
आनंदाबरोबरच आपले प्रेम दुरावणार किं काय?? अशी भीती वाटूं लागली पण शेवटी प्रेम जिंकले.
    अस्मादिकांनी Mtech करण्या साठी नकार दिला.
    घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटत होते राग ही आला होताच. चालून आलेली संधी वाया घालवू
नये असे सर्वांचे मत होते. माझ्या भावाने सर्व तयारी करून कानपुर ला हॉस्टेल मध्ये माझी रवानगी केली.
माझे प्रेम फुलण्या अगोदरच कोमेजून जाईल किं काय? असे वाटूं लागले, पण म्हणतात नां "जहाँ चाह वहाँ राह "
   काकूंशी झालेल्या गट्टीची मदत घेतली. काकूंशी पत्र व्यवहार सुरू केला. पत्रात संबोधन काकूंचे,पणमजकूर तिच्या साठी असायचा
  आता तिला देखील हा प्रेमाचा लपंडाव आवडू लागला असावा पण त्या वेळेस फोन नव्हते व पत्र पाठवायची हिम्मतच नव्हती.
    खल नायक Mtech चा अभ्यास क्रम व काकूंशी पत्र व्यवहार चालु होता. दर आठवड्याला येणाऱ्या काकूंच्या पत्रातून तिची खुशाली कळत होती. दूधाची तहान ताकावर भागत होती!
  असे करता करताच सहा महीने संपले. सेमिस्टर ब्रेक मिळाला, घरी न जाता तडक भोपाळला आलो.
 मात्र मला पाहताच झालेला आनंद तिला लपवता आला नाही, तिच्या गहिऱ्या घाऱ्या डोळ्यांनी प्रेमाची कबुली दिली.
 अस्मादिकांच्या आनंदाला पारावर नव्हता, आपल्या प्रेमा बद्दल तिला सांगावे असे वाटत
होते.
     एक दिवस हिम्मते शहनशहाँ ने "तिला "प्रेमपत्र लिहिले. जीवनातील पहिले वहिले प्रेमपत्र!! त्या रात्री वहीची कितीतरी पाने शहीद झाली असतील कोण जाणे!! शेवटी रात्र भर जागून एकोणीस पानाचे प्रेम पत्र तयार झाले.
आता "तिला "तें द्यायचे कसे??
  शेवटी हिम्मत करून पुस्तकात लपवून तें प्रेमपत्र मुमताज कडे पोहोचते केलें.
  आता तें वाचायचे कोठे?? कोणी पाहिले तर??
"तिला "मोठ्ठा प्रश्न पडला. शेवटी घरातील टॉयलेट च मदतीला धावून आला. आतून कडी घालून किती तरी वेळा त्याचे पारायण केलें
असणार.
त्या पूर्ण रात्री मी नीट झोपू शकलो नाही, भलभलते विचार मनात येत होते. काका आपल्याला घरा बाहेर काढतआहेत असे काही बाही स्वप्नं येत होती. पहाटे केव्हा तरी डोळा लागला.
झोप उघडली तेव्हा "ती "बैठकीत काकांबरोबर
हळू आवाजात काही तरी बोलत होती. नक्कीच "त्या "पत्रा बद्दल बोलत असणार म्हणजे आता आपली येथून उचल बांगडी होणार!
"अरे तिकडे कां उभा आहेस ?? ब्रेक फास्ट साठी ये"
मी हळूच काकांच्या चेहऱ्या कडे बघितले, रागाचा लवलेश ही नव्हता. "हुश्श " मी सुटकेचा श्वास टाकला, म्हणजे तिनें काकांना काही सांगितले नव्हते तर!!
म्हणजे नक्कीच तिचा होकार असावा.
 पण अद्याप तिनें स्वतःच्या तोंडाने प्रेमाची कबुली दिली नव्हती. माझे प्रेम डोलायमान होते.
  मग एक दिवस कॉलेज ला जाताना तिला बस स्टॉप वरच गाठले. मला पाहून "ती " कावरी बावरी झाली. मी थेट तिच्या समोर जाऊन उभा
राहिलो, तिच्या नजरेशी नजर भिडवत विचारले
"पत्र मिळाले कां??"
          "हों " ती हळूच पुटपुटली.
          "हां "या "नां " मला उत्तर हवंय!
      "नंबर वन " ती मिस्किल पणे हळूच हसली.
माझे मन फुल पाखरा सारखें हवेत तरंगू लागले.
मी परत तिच्या कडे नजर टाकली
पण एव्हाना ती मैत्रिणीच्या घोळक्यात सामावून गेली होती , मी तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघतच
राहिलो. वळणावरून मात्र तिनें हलकेच हात उंचावुन मला टाटा केला.
  माझे एक तर्फी प्रेम दुतर्फी झाले होते. माझ्या आनंदाला पारावर नव्हता.
संध्याकाळी आल्यावर काकूंच्या हातात पेढ्याचा पुडा ठेवला.
"कशा साठी "काकूंनी प्रश्नार्थक नजरेनं विचारणा केली. "सहजच "असे म्हणत मी सहेतूक तिच्या कडे बघितले, ह्या वर ती मिस्किल पणे गोड हसली.
    आता सर्वांच्या नजरा चुकावून आमचे प्रेम फुलत होते.सर्वच कसे मनाला सुखावत होते.
पण "हाय रें मेरी किस्मत "ग्वाल्हेर हून घरी येण्या विषयी फर्मान आले.
 "तिला "सोडून घरी जाण्याची मुळीच इच्छा नव्हती मग ह्यावर देखील युक्ती काढली.
माझ्या डॉ वहिनींच्या मैत्रिणीकडे धाव घेतली
व कसेही करून ताप चढावा अश्या औषधाची
मागणी केली."असे औषध कसे मिळणार?"
तिनें मला चक्क वेड्यातच काढले. "हों "मी प्रेमात वेडाच झालो होतो. शेवटी मार्ग निघाला
चार घंटे कांदा काखेत दाबून ठेवला ( हे पण काकूंनी सांगितले होते )संध्याकाळी मी तापाने फणफणलो, तापात घरी जायचा प्रश्नच नव्हता व "तिच्या "कडून सेवा करवून घेण्यात वेगळाच आनंद होता.
  दोन दिवसाने ताप उतरला पण त्या लेडी डॉक्टर ने धोका केला व आमची इतंभूत माहिती वहिनी पर्यन्त पोहोचवली व आमच्या प्रेमाचा गौपस्फोट झाला.
   आमच्या प्रेमाच्या गोष्टी "आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर "झाल्या.
आई बाबा, दादा वहिनी, बहीण, तिच्या कडील काका काकूं सर्वां समोर आमच्या प्रेमाचे रंग उधळले गेलें व त्यात आम्ही न्हाऊन निघालो.
काका काकूंनी तिच्या मावशीने सुचवलेल्या उत्तम स्थळाला विनय पूर्वक नकार दिला.
ह्या सर्व गडबडीतच "तिचे "Bsc 2 व माझे Mtech पूर्ण झाले व मला नोकरीं लागली.
मग मात्र मला धीर धरवेना व तिच्या फायनल परीक्षेच्या अगोदरच लग्नाचा बार उडवून दिला.
   ह्या गोष्टीला पन्नास वर्षे झाली, आमचा संसार मुलं, सुना नातवंडानी भरला आहें
कधी तरी एकांतात प्रेमाने मी तिला विचारतोच!
"डार्लिंग, जब में होऊंगा साठ साल का, और
तुम होगी पचपनकी,
  बोलो प्रीत निभाओगी नां, तब भी अपने बचपन की "
आणि काय? ह्या वयात ही "ती "चक्क लाजते 
व "तिच्या "गाला वर फुललेले गुलाब प्रीत निभावण्याची हामी भरतात!!


डॉ. विद्या वेल्हाणकर
   अंधेरी, मुंबई.

 

 


 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू