पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हे वाटतं तेवढं सोपं नाही

'हे वाटतं तेवढं सोपं नाही'



सुट्टीच्या दिवसी सकाळी अगदी लवकर, म्हणजे साधारणतः साडे आठच्या सुमारास, सायलीच्या मोबाईल फोन पर एक अनोळखी नंबर वरून कोल आला. काहीश्या शोधक नजरेने तिने तो नंबर आपल्या मोबाईलच्या 'ट्रू कोलर' एपवर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या अज्ञात व्यक्तिने आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठीचं 'नोन डिस्प्ले' ची पर्यायी सुविधा घेतली असून सायलीला काही त्या नंबरची ओळख घेता आली नाही.

 

सायलीला त्या गुप्त कोलरचा खूप राग देखील आला पण असे वैतागी कोल्स हल्ली सर्व लोकांना हैराण करत असतात, हे लक्षात येताच तिने त्या कोलकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात एकदा पुन्हा रमली. ती रिंग टोन वाजून वाजून दमली आणी थकल्या नंतर पुन्हा शांत होऊन गप्प बसून राहीली.

 

दुसर्‍याच क्षणात परत त्याचं नंबर वरून पुन्हा कोल वाजला. तिने देखील पहिलाच पर्याय पुन्हा वापरला; पण शेवटी सतत वाजणाऱ्या त्या कोलला वैतागून आखेर चौथ्यांदा सायलीनी तो कोल उचलला, "हलो!" ती काहीश्या चढलेल्या आवाजातंच बोलली.

 

"हलो, आपण कोण आहात?" एका अज्ञात आवाजनी सायलीच्या डोक्यात थोडासा रहस्यमयी वातावरण निर्माण केला.

 

पण तरीही क्षणात भानावर येत तिने वैतागून विचारलं, "हे यु, एकतर मला सारखा सारखा कोल करून त्रास देताय आणी वर आवाज करून विचारता, मी कोण म्हणुन! तुम्ही आधी सांगा तुम्हाला कोण हवयं?" आपल्या चढलेल्या आवाजातंच ती प्रश्न विचारू लागली.

 

इतक्यात समोरून एक कठोर काठीसा चिडलेला पुरुष स्वर तिच्या कानावर पडला, "नमस्कार मॅडम, पण आपण सायली ओकचं आहात, ना? मी लोणावळा पोलीस चौकीतून इंस्पेक्टर लिहल बोलतोय. आपण पुणे, चिंचवडवासी कोणी निनाद बेमलेकरला ओळखतात का?"

 

घाबरलेली सायली एवढाच विचारू शकली, "काय? काय झालंय निनाद ला?" इतकच काही ते बोलता बोलताचं जवळच असलेल्या खुर्चीवर बसली. तिचे पानवलेले ङोळे आणी चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काहीतरी वाईट बातमी असावी असं काहीसं भासवतं होती.

 

इतक्यात चालु असलेल्या कोल वरून आवाज आला, "म्हणजे तसं काळजी करण्या सारखां काही घडलं नाहीये, पण हा मुलगा ईथे जवळचं जिन्यावरून सरकत खाली पडून बेशुद्ध झालाय. त्याच्या मोबाईल फोन मधले कोल रेकॉर्ड वरून आपला नंबर मिळाला, म्हणून संपर्क केला."

 

पूर्णपणे स्तब्ध झालेली ती तशीच शांत बसून होती. तिच्या मेंदूतील सगळेच चेतन, संवेदनशीलता निष्क्रिय झाल्यावर ती कोसळून बसली. इतक्यात तो इंस्पेक्टर पुन्हा बोलला, "मॅडम, आपण आधी संपूर्ण घटना समजून घ्या, म्हणजे आपल्याला तसं त्याच्या कुटुंबीयांशी बोलाणं थोडं सोपं होईल." 

 

ती घाई घाईत त्या इंस्पेक्टर वर चढून आवाजात बोलली, "त्याचे कुटुंबीय सगळे मुंबईला राहतात. मी ईथे चिंचवडला राहते, मी लवकर येईन. तो कोणत्या हॉस्पिटलला आहे? माला पत्ता सांगा लवकर." तिच्या त्या रडत्या आवाजात तिची काळजी स्पष्ट जाणवत होती.

 

सायली होती त्याच घरच्या कपड्यांवर म्हणजे टीशर्ट आणी पजामा वर स्कुटीची चावी घेऊन दरवाजातून धावत सुटली. तिची स्कुटी तिने थेट वरच लोणावळ्या दिशेने अक्षरशः पळवली. पण हे सगळ होत असताना तिच्या मनात अचानक काहीतरी नवीन विचार आला आणी ती पटकनं थांबली. रेखीव काळजा सारख्या काळ्याभोर चमकणार्‍या हातातली स्मार्ट वोच, जी बंद धड्याळा सारखी लाजून काजल समान काळी दिसत होती, त्याला स्पर्श करून चमकदार डिजीटल वेळ पाहिली आणी क्षणात आपली स्कुटी चिंचवड रेलवे स्थानका कडे वळवून ती घडलेल्या घटनांचा विचार करू लागली. तिला हे देखील समजलं नाही की कधी आपण चिंचवड रेलवे स्टेशन परिसरातील आलेला पार्किंग लॉट मध्ये येउन पोचलो. 

 

समोरच चिंचवड रेलवे स्टेशनवर जाणार पूल होता. आणी पुणे लोणावाळा लोकल ट्रेन सुद्धा चिंचवड रेलवे स्टेशनवर येउन थांबली होती. इतक्यात बाकी सगळं विसरून सायलीने घावायचा प्रारंभ केला. रेलवे मधून उतरून पूल पार करणाऱ्या तमाम गर्दीला पुलाच्या एका बाजूने, डाव्या बाजूने, चेंगराचेंगरी करून, धक्का देत, वाट काढत, लोकल ट्रेन कडे लक्ष केंद्रित करून, अखेर तिने स्थानकातून सुटलेली ट्रेन पकडलीचं.

 

आपण लोकल ट्रेन प्रवासासाठी आवश्यक असलेल साधं चिंचवड लोनावाळा ट्रेन टिकीट धेतल नाही, हेही तिच्या लक्षात आलं नव्हतं. हे सगळं जरी असलं तरी आपण स्कुटी पेक्षा ट्रेनने अधिक लवकर लोणावाळ्याला पोहोचू याचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून लपत नव्हता.

 

लोकल ट्रेनच्या एका सीटवर बसल्यावर आता तिचे विचारचक्र पुन्हा गतीने सुरू झाले होते, 'हे सांगीतलं तर निनादाचे आई बाबा घाबरून जातील. त्यांची काळजी वाढेल. आधी मी जाऊन बघते. नक्की काय झालंय ते समजल्यावर मग बघेन कसं सांगायचं ते.' असी हलकी बडबड करत, पानवलेल्या डोळ्यांनी ती सुखकर्ता दुःखहर्ता, विघ्नहर्त्या गणेशांचाचं धावा करत होती आणी लोकल ट्रेन पुढे सरकत होती.

 

*

 

निनाद आणी सायली हे दोघेही मुंबई येथील परळ स्थित एका चाळीत राहणारे शेजारी होते. हे दोघेही एकमेकांना ओळखत असले तरी त्यांच्यात मैत्री वैगेरे नव्ह्ती. संयोगाचे म्हणूयात ह्या दोघांनाही कॉलेज अभ्यासासाठी चिंचवड टेक्निकल महाविद्यालयात एकत्र प्रवेश मिळाला आणी त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले.

 

निनाद होस्टेल मध्ये राहून अभ्यास करत होता आणी सायली तिच्या वडिलांचे खास मित्र विनायक काकांच्या घरी राहून अभ्यास करत होती. विनायक काकांची मुलगी म्हणजे कामिनी, सायलीच्या वयाची होती. त्यामुळे सायली त्यांच्या घरी सहजच रुळली. तीथे गेल्यावर ती लवकरच त्याचं बरोबर एडजस्ट झाली. 

 

एक सत्य हे ही होत की सायली ही दिसायला अतिशय सुंदर तरुणी होती. सहजतेने प्रचलित असलेल्या सुंदर तरुणी सडपातळ, गडद आकृती ह्या व्याख्येला अपवाद अशी ती मात्र रूपवती कुर्मुज, भडक, पातळ नसून मांसल शरीर, अरुंद कंबर आणि लांब पाय असलेली आकर्षक ललना होती. येथील प्राचीन तैलचित्रांमध्येही अशा स्त्रियांचे सौंदर्य दाखवण्यात चेहर्‍या पेक्षा शरीराला अधिक महत्त्व दिलेले आहे.

 

तसा निनाद थोडाफार देखणीत कमी पडायचा. सायली सुंदर आणी गोरीपान तरूणी तर निनाद काहीसा सावळा पण मनोहर दिसायचा. कदाचित या फरकामुळेचं तो स्वतःला कमी लेखायचा आणी म्हणूनच त्याच लहानपणा पासून सायलीवर मनापासून प्रेम असतानाही त्याने कधीही व्यक्त केला नव्हतं. त्याला माहीत होत की सायलीला सुध्दा तो आवडतो पण त्याला वाटायचं की जर सायलीने आपल्या कडे पहिले पाऊल ऊचललं तरी किती बरं होईल!

 

पण त्याने सायली आणी समीरची वाढती मैत्री देखील पाहिली होती आणी म्हणूनच त्याला कुठेतरी वाटंत होतं की सायली समीरला पसंत करते.

 

*

 

सायली त्या आलेल्या कोल प्रमाणे, सांगितलेल्या पत्यावर इंस्पेक्टर लिहल सी झालेला बोलण्या प्रमाणेच त्या हॉस्पिटल मधे पोचली. तिथे हॉस्पिटलच्या परिसरात, हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच त्याला एक इंस्पेक्टर दिसला. तिला तीथे हॉस्पिटलात पोचलेलं पाहून तो पुढे आला, "मिस सायली ओक?"

 

ती काहीशी वैतागून ओरडली, "यस, पण निनाद कुठे आहे?"

 

त्यावर तो इंस्पेक्टर म्हणाला, "चील, मिस सायली, कुल डाऊन. काळजीचं काही कारण नाही. त्याला एक्सरे काढण्यासाठी दुसर्‍या दवाखान्यात घेऊन गेलेत."

 

ती घाबरून अनेक प्रश्न विचारू लागली, "सर, तो ठीक आहे, ना? तूम्ही खरं तर बोलतायं, ना? कशी हॉस्पिटल आहे ही जिथे साधी एक्सरे मशीन देखील नाही?"

 

तो हळूवार स्मित करत बोलत होता, "अहो ह्या हॉस्पिटलातली एक्सरे मशीन काही बिघाड झाल्याने काम करत नसल्याने त्याला जवळपास असलेली दूसरी हॉस्पिटलात घेऊन गेलेत. पण आपण त्यांच्या कोण?"

 

आपल्या डोळ्यात कुतूहलपणे बघणाऱ्या इंस्पेक्टर कडे दुर्लक्ष करून ती इकडे तिकडे पहातांना हळूच म्हणाली, "सहाध्यायी मैत्रीण."

 

"बरं." तो निश्चित होउन बोलत होता, "आपण एक काम करूया. त्याची रुग्णवाहिका परत येई पर्यंत त्या तिथे चहाची टपरी आहे, तिथे जाउन चहा घेऊया आणी या केस बद्दल ही थोडं  बोलु."

 

इच्छा नसताना ही ती इंस्पेक्टर साहेबां सोबत टपरीवर गेली. दोन कटींग चहा घेऊन दोघेही एका बाकड्यावर बसले. गरमागरम चहाची चूस्की घेत तो इंस्पेक्टर विचारत होता, "हा निनाद, आपला फक्त सहाध्यायी मित्र आहे की काही तरी जास्त?" ती आदि पासून दुःखी होतीच पण या प्रश्नावर कोसळून गेली, "माहीत नाही."

 

इंस्पेक्टर लिहल समजला की तिने नाही असं म्हंटल नव्हतं. ते पुढे बोलू लागले, "तो थोड्या वेळा साठी, बेशुद्ध अवस्थेत, फक्त 'सायली सायली' असं बडबडत होता म्हणून मी आपल्यांस कोल केला."

 

हे ऐकून ती वैतागून रडकुंडीला येऊन मात्र एवढंच बोलली, "माझ्या समोर तरी तो कधीही असं नाही बोलला."

 

*

 

एका दिवसी दोन मित्र एकत्र बसले होते. निनाद थोडाफार उदास होता म्हणूनच तो काहीतरी बडबडत होता, "हे देवा, ह्या समीरचं काहीतरी कर. माझी सायली पण त्याचाशी अशी वागतेयं जसं ती त्याला पसंतचं करतेय, आणी तो समीरचं काय! त्याचा जागी कोणीही मुलगा असता तर त्याला पण सायली सारखी गर्लफ्रेंड मीळाली, तर त्याला नक्कीच आवडली असती."

 

हे ऐकून त्याचा बाजूला बसलेला मित्र कौशल्य म्हणाला, "अरे वेड्या, पण तू हे तिला कधी बोलला आहेस का?"

 

"काय?" तो अजून ही अतिशय गोंधळलेलाचं होता.

 

"काय, म्हणजे काय? तू तिला सरळ बोलव आणी स्पष्टपणे तिला विचारून घे. तिच तुझ्यावर लहानपणा पासून खरोखरं प्रेम करते ना! आणी समजा तुझ्यावर प्रेम करत असेल तर सगळं भारीचं होईल." कौशल्य आपल्या मित्राला खरी हिम्मत देत होता.

 

"पण…!" निनाद अजून ही तिथेचं अडकला होता, "पण ती मला पसंत करत नसेल तर…!"

 

कौशल्य हसून म्हणाला, "तर मग काहीतरी जुगाड करावा लागणार. पण तु काळजी करू नको. मी लावतो काहीतरी डोकं."

 

निनाद कडे त्याचं ऐकण्या खेरीज मार्ग नव्हता, "तो जुगाड आताच कर."

 

"ठीक आहे." कौशल्य भार ठामपणे बोलला, "थोडं नाटक करावं लागेल आणी थोडं खर्च ही होईल."

 

*

 

इंस्पेक्टर साहेबनी दोन टाळ्या गजवल्या बरोबर तीथे एक आश्चर्यजनक गोष्ट घडली. तीथे ठीक-ठाक, सशक्त आणी सुस्‍वस्‍थ निनाद समोर उभा होता आणी तो फार मोठ्या आवाजात ओरडला, "आई लव यु, सायली." 

 

निनादला असा समोर पाहून सायलीने सुटकेचा निःश्वास सोडला आणी त्याचा कडे घावत सुटली. त्याला घट्ट मिठ्ठी मारून तिने सकाळ पासून आवरून धरलेल्या अश्रुंचा बांध अखेर सुटलाचं. त्याला मसकरीने मारतचं ती म्हणाली, "गाढवा, हे एक वाक्य बोलायला तू इतकी वर्ष तर लावलीसचं आणी आज हे मला असं छळून फार मजा आली ना तुला! यु इडियट, आई टु लव यु." असं महण्त तिने थेट त्याच्या गालावरचं चुंबन दिले.

 

आता मग काय हवं होत. तिच्याकडे नजर वर करून बधायला घाबरणार्‍या निनादने थेट शाहरुख खान बनत तोंडात लांब देठाचे लाल गुलाब घरून, दोन्ही हात उघडून उभा राहीला. मग ओकांची सायली काय कमीची, लगेच काजोल बनुन थेट मिठीतच!

 

सायली लाडात बोलली, "निन्या, हे सगळं नाटक होता ना!"

 

"हो." 

 

"आणी हे इंस्पेक्टर साहेब, कोण?" तिला हे नाटक पसंत पडलं.

 

"हे इंस्पेक्टर नाही गं, माझा मित्र आहे, कौशल्य. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम असूनही माला सांगता येत नव्हतं गं. म्हणून त्यानेच हा सगळा जुगाड केला." त्याने सगळं काही खरं सांगितलं.

 

"हो वहिनी, हे इंस्पेक्टरची वर्दी सुद्धा भाड्याची आहे." कौशल्य फार आनंदाने सांगत होता.

 

सायली खोटं खोटं नाराज होऊन बोलली, "माला आधीपासून माहीत होत आणी ह्या तुझ्या महान मित्राला शिरसाष्टांग नमस्कार." ती निनाद कडे बघुन म्हणाली, "तुझ्या मुळे मला पण समीरला घेऊन नाटक करावं लागल. आणी काय रे शहाण्या, तू हे मला सरळ येऊन बोलु शकला असतास ना! मग तर ह्या नाटकाची पण गरज पडली नसती."

 

निनाद काहीसा बावरला आणी गंभीर होऊन म्हणाला, "हे वाटतं तेवढं सोपं नाही."

 

सायली हसायला लागली, "बरं बरं, मग आता आपण आभार मानले पाहिजे तुझ्या ह्या मित्र कौशल्यचा. ज्यांच्या मुळे…"

 

कौशल्यने तीचं वाक्य पूर्णचं होउन दिला नाही, "वहिनी, अहो माझं पण एक काम आहे आपल्या कडे…"

 

"माझ्या कडे?" ती चकित होती, "काय बरं?"

 

तो क्षणापूर्वीचा कडक इंस्पेक्टर अचानक लाजला आणी म्हणाला, "ते मला विनायक काकांची कामिनी…"

 

ती आनंदाने उसळली, "ओह…! आता माझ्या आलं लक्षात की आमची कामिनी वहीत कौशु कौशु लिहिते तो आहे तरी कोण! तुमची केस तर मग आधीच सोडवली आहे तुम्ही. माझ्या मध्यस्तीची तर गरजच नाही उरलीये."

 

तितक्यात ह्या सगळ्या नाटकचा दिग्दर्शक कौशल्यच्या चेहर्‍यावर हसू उमटलं, तरी तो मात्र बराच उदास आणी गंभीर होऊन बोलला, "हे वाटतं तेवढं सोपं नाही."

 

(समाप्त.)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू