पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नजर वर माझी प्रतिक्रिया

नमस्कार

 मी सौ.राधिका माजगावकर पंडित. पुणे 51.

 

'नजर ' पुस्तक लेखिका ऋचा दीपक कर्पे शॉपीजन इन.मराठी विभाग प्रमुख.

 नजर पुस्तकावरची माझी प्रतिक्रिया.

 

 फुलांनी फुलावं सुगंधांनी दरवळावं साहित्यक्षेत्रात ऋचाताईंनीच झळकावं .

ही मनापासून ची सदिच्छा आणि शुभेच्छा

 ऋचा ताईचं 'नजर' पुस्तक मी बऱ्याच जणांना वाचायला दिले प्रत्येकाचा अभिप्राय हाच होता की आम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि आमची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलली. मलाही ते पटलं. कारण ऋचा ताईने पुस्तकातून अतिशय सुंदर विचार वाचकांपुढे मांडले आहेत.

 मुक्या चिमणी पाखरांना तिने बोलतं करून एका कणात मणाचा आनंदच वाचकांपुढे ठेवला आहे. पारिजातक वृक्षाच्या फांद्या हलवल्या की सुगंधा बरोबर धवल पुष्पांचा सडा अंगणात बरसतो. अशा वृक्षात जिवन्तपणा आणून लेखिकेने आनंदाचा वर्षावच आपल्यावर केला आहे. वासनेच्या पलीकडेही उदात्त प्रेम असू शकतं ही नजर तिसऱ्या लेखातून सुरेख मांडली आहे. नव्या जुन्याचं अवचित्य साधून संक्रांत भेटच लेखिकेकडून वाचकांना मिळाली आहे. शुभंकरोतीचा अर्थ गर्भ नव्या नजरेने उलगडतो.श्रीकृष्णाची अनेक रूपं वाचताना वाचकांची समाधी लागते. सातव्या लेखातला तिरंगा मनात अभिमानाने फडफडत राहतो.मोठ्यांना मान देऊन त्यांचा आदर करण्याची शिकवण ऋचा ताई आई-बाबांकडून शिकली आहे. तिच्यावर उत्तम विचार आणि सुंदर संस्कार करणारे तिचे बाबा श्री.दीपक, आई सौ. उज्वला व इतर वडीलधारे ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, देणारा देतोच तरी पण घेणाऱ्याने हे संस्काराचं दान तितक्याच आत्मीयतेने घ्यायला हवंय हो ना? आणि तो गुण ऋचा ताईने वडीलधाऱ्यांकडून मिळवला आहे.

 मी सौ राधिका माजगावकर पंडित पुण्याला राहते श्री मेघश्याम सोनवणे यांनी माझ्या कथा एक हजार लोकांपर्यंत पोहोचवल्या ऋचा ताईने त्या वाचल्या. आणि शॉपिजन इन चा उपक्रम माझ्यापुढे मांडला. शॉपीजनच्या उत्तम कार्याच्या माध्यमातून माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याबद्दल उपक्रमप्रमुख आणि इतर संपूर्ण टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. श्री सोनवणे सर आणि ऋचा दी.कर्पे यांच्यामुळेच माझ्या कथा वाचकांपुढे मांडल्या गेल्या आहेत. मला आवर्जून पुन्हां पुन्हां एवढच सांगावसं वाटतंय की, ऋचाताई कर्पे ह्यांच ' 'नजर'.. हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचावं व संग्रहातही ठेवावं , इतके त्या पुस्तकातले विचार प्रगल्भ आणि नवी दिशा दाखवणारे आहेत.मी तर म्हणेन मनोरुग्णाला कौन्सिलर कडे जायलाच नको.या पुस्तकातील विचार वाचूनच तो खडखडीत बरा होईल. इतके लेखिकेने मांडलेले विचार प्रभावशाली आहेत.माझी खात्री आहे तुमचे ही मत असंच असू शकेल. उत्तम नजरेचा...नजराणा.. वाचकांना दिल्याबद्दल ऋचाताई तुम चे खूप खूप मनापासून कौतुक. आणि भावी उज्वल यशाबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा मनातलं शब्दांत मांडणारी,

 

आपली मैत्रीण

 

सौ.राधिका माजगावकर पंडित पुणे 51

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू