पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवांची शिंपण

आठवांची शिंपण

हासरा चंद्र (चंद्रहास सोनपेठकर)


माणूस म्हणतो कधी कधी,
तुला विसरणं अशक्य आहे.
मी म्हणतो का विसरायचं?
न विसरता जगणं शक्य आहे.


विसरण्यासाठी काही करणं,
हा आठवण्याचा बहाणा असतो.
तुम्हाला म्हणून सांगतो बरं,
माणूस तितका शहाणा असतो.


आली आठवण, काय बिघडतं?
बहुतेकांचं असंच तर घडतं.
कोणी उन्हात कोणी पावसात,
भिजणं तर इथे सा-यांचं घडतं.


जीवन म्हणजे भिंत नाही,
सारवलं की झालं काम.
जगणं कुणाचं रितं नाही
सावरलं की होतं काम.


छान छान आठवावं आपण,
मात्र निर्मळ असावं दर्पण.
विसरण्यात स्वार्थीपण असतं
अन् आठवण्यात समर्पण.


जीवनाच्या मशागतीला
आठवांची शिंपण तर हवीच!
गोष्ट तशी जुनीच असते,
प्रत्येकवेळी भासते मात्र नवीच!

 

******

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू