पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गीत आणि गुरुवार

गीत आणि गुरुवार



स्वप्नामधी मी व्यस्तचि असता

गीत रम्य स्फुरले

त्या तरुतळी प्रभातसमयी

दत्तगुरु दिसले!


हाती छाटी आणि कमंडलु

चेहऱ्यावरती तेज दिव्य दिसले

भगवंता त्या वंदन करण्या

नश्वर कर माझे जुळले!


दिव्यरुप ती त्रिमूर्ती बघता

मस्तक हे नमले

ब्रह्माविष्णु सवे महेश्वर 

आशिर्वच देत देत हसले!


गुरुवासरे जगन्नियंता

सामोरी दिसला,

भवभयभिती जळोनी गेली

अवनीवरती स्वर्ग मला भासला!


©️ डाॅ.श्रीकांत औटी

         नेवासा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू