पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जरा विसावू या वळणावर

*जरा विसावू या वळणावर*...!


        नीताने तिच्या मैत्रिणीसोबत माथेरानला जाऊन साजरा केलेला तिचा चाळीस वा वाढदिवस, त्याचे फोटो ,तिने केलेली मजा आणि याचे तिने स्टेटस वर टाकलेले फोटो हा तिच्या ओळखीच्या महिला वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला. जो तो याबद्दल कुजबुजत आपली चांगली(?) वाईट मते एकमेकात व्यक्त करत होता." हे काय वय आहे का वाढदिवस साजरा करायचे?"   "हो ना ! बर , निदान कुटुंबासोबत तरी करायचा . कॉलेजच्या मुलींसारखा मैत्रिणींसोबत केलाय" " आपल्याला आवडत नाही असे वागणे" "पण फोटो बाकी छान आलेत तिचे." किती छान मजा करताहेत सगळ्याजणी" अशा चर्चेला नुसते उधाण आले.  नीता जेव्हा परत आली तेव्हा तिच्या कानावर या गोष्टी कशा कोण जाणे गेल्याच.पण तीने फारसे मनावर घेतले नाही.कारण कोल्ह्याला द्राक्षे आंबटच असतात हे तिला ठाऊक होते. आणि तिच्या नवऱ्याची संमती असल्याने बाकीच्यांच्या बोलण्याकडे ती लक्षच देणार नव्हती.कारण तिला तिचे आयुष्य इतरांच्या नाही तर स्वतः च्या मनाप्रमाणे जगायचे होते.निदान वयाच्या ह्या टप्प्यावर तरी.. त्यामुळे ज्याच्या मार्फत तिला सर्व गोष्टी कळल्या  त्याच्याच मार्फत तिने आपले मत ज्यांनी तिला नावे ठेवली त्यांच्या पर्यंत पोहचवले. ती म्हणाली 'माझ्या आयुष्यातील या सुंदर वळणावर विसावत मी अशीच मजा करणार आहे, जीवनाचा आनंद घेणार आहे".  मजेची गोष्ट म्हणजे तिचे मत ऐकून नाकं मुरडणाऱ्या साऱ्या नंतर तिचेच अनुकरण करताना दिसल्या.हे पाहून नीताला देखील आनंद झाला. अर्थात त्यात चुकीचे काहीच नाहीये.

        जीवनातील वय वर्ष ४० ते ५० या दरम्यानचे वळण हे स्त्रियांसाठी जरा सुखकारक असते. अर्थातच हे मानणाऱ्यांसाठी..! नाहीतर काही जणांची कायमच काहीतरी तक्रार असते जीवनाबद्दल.. तर बघा, वयाच्या या टप्प्यावर मुले मोठी झालेली असतात आईची म्हणावी अशी गरज त्यांना राहिलेली नसते. त्यांचे स्वतंत्र विश्व तयार होत असते.त्यामुळे जबाबदरी थोडी कमी झालेली असते. नवीन लग्न झाल्यानंतरचा सासरचा धाक आता पूर्वी इतका राहिलेला नसतो. संसारात स्त्रीचे एक स्थान निर्माण झालेले असते. स्वतः चे निर्णय स्वतः घेण्या इतपत आत्म विश्वास तिच्यात आलेला असतो.    आयुष्य थोडेसे स्थिरावते. तब्येतीच्या कुरबुरी फारशा नसतात. त्यामुळे सुखकारक अशा या पर्वात, या वळणावर तिने थोडे विसावत स्वतः साठी जगले पाहिजे. कारण पन्नाशी नंतरच्या पुढे , आयुष्याच्या सेकंड इंनिग मध्ये पुन्हा तिला जावई, सूना येतात आणि सासू,आज्जी या नव्या भूमिका तिला समर्थ पणे निभवायच्या असतात त्यासाठीचा बूस्टर डोस याच काळात घेणे हिताचे असते.त्यामुळे मैत्रिणी सोबत छान फिरण्यास जावे इतके दिवस करायच्या राहून गेलेल्या गोष्टी कराव्या. हौसमोज करावी ,स्वतः च्या तब्येतीची काळजी घ्यावी. छान हसत खेळत रहात या वळणावर विसावत जीवनाचा आनंद  घ्यावा. पहा पटते का ते...?

✍????सौ.दीप्ती समीर कुलकर्णी...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू