पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा 

तुझी नेहमीची तक्रार असते ना 
तुझ्यासाठी वट पौर्णिमा करावी म्हणून
वट पौर्णिमाचा उपवास नाही 
पण काहीतरी मनातलं सांगायचा प्रयत्न करणार माझा कवितेतून...!

उगाचच का रे आपण 
कधी कधी खूप भांडतो?
नेहमी प्रमाणे आधी मी चिडते, 
मग तू चिडतोस 
आणि मग दोघंही एकमेकांचा 
चुकांचे हिशेब मांडतो...!

अरे संसार म्हंटले के आलेच 
वाद विवाद ,भांड्याला भांड 
लागल्याचा होईलच निनाद...
मग कशाला रे चिडायच?
मनातल्या मनात कुढायच... 
तुझे माझे दोष काढत 
वादाला तिखट मीठ लावायचं....!

 तू आणि मी काय 
वेगळे आहोत का रे? 
तुझी मी आणि आणि माझा तूच रे..!
कठीण वाटतं कधी कधी 
पण सोपं आहे रे आपलं नातं जपणं..!

आठवत ना आपली पहिली भेट, तुझा माझा पहिला स्पर्श आणि तुझं मला मिठीत घेणं...
आठवतं ना आपल्याच लग्नात बावरून गेलेलो आपण दोघे...
भविष्याची स्वप्ने बघितलेले आपण दोघे...!

जन्मतारी च आपलं हे सुंदर नातं
विश्वास आणि निरपेक्ष प्रेमावर टिकलेल हे नातं!!

अरे संसार म्हणजे ऊन पाऊसा सारखा...
सतत रिमझिम बरसणारा...
चटके लागतील रे कधी कधी
पण तू सावली सारखा जवळ राहा माझा,मग मला त्या उन्हाचे हि काही वाटणार नाही....
तू असाच सोबत राहा बाकी काही नाही....!!!

नेहा खेडकर, अहमदाबाद


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू