पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वेळ हा लागतोच

लोणचं असो व मैत्री
मुरायला वेळ हा लागतोच ।

भात असो वा वृत्ती
दाबायला वेळ हा लागतोच।

वरण असो वा कढी
उकळून स्वाद यायला वेळ हा लागतोच ।

आचार असो वा विचार
अंगवळणी पडायला वेळ हा लागतोच ।

सून असो वा जावई
प्रपंचात रुळायला वेळ हा लागतोच ।

मान असो वा अहंकार
जिरायला वेळ हा लागतोच।

मन असो वा विचार
जुळायला वेळ हा लागतोच।

मंत्र असो व तंत्र
समजायला वेळ हा लागतोच।

पसारा असो वा मन
आवरायला सावरायला वेळ हा लागतोच।

लोणी असो वा भक्ति
घुसळून वर यायला वेळ हा लागतोच।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू