पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पर्यावरण

ढीग लागले कचऱ्याचे
स्वास्थ्याची चिंता कुणास ।
हवे नको सारेच घ्यायचे
विचार नसतो कधी मनास ।
काम सरले फेकून मोकळे
होतो त्रास तो तर जनास ।
प्लास्टिकने तर केला कहर
सौंदर्य सृष्टीचे गेले लयास ।
जिकडे तिकडे दिसे प्लास्टिक
उचलण्याचा नाहीच कयास ।
ना शुद्ध भोजन ना शुद्ध वायू
म्हाताऱ्यांचे थांबतात श्वास ।
फॅशन पुढे नतमस्तक सारे
प्लास्टिक देतो फक्त आभास ।
वचन हवे मज धरा म्हणते
प्लास्टिक टाळायचा घ्या ध्यास ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल : 8380074730








पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू