रचना के विवरण हेतु पुनः पीछे जाएँ रिपोर्ट टिप्पणी/समीक्षा

प्लास्टिक प्रदूषण

अलका पुणतांबेकर 

वडोदरा गुजरात।        

              प्लास्टिक प्रदूषण एक समस्या

               ________________________

 

आज  पर्यावरण प्रदूषण ही एक जागतिक पातळीवर मोठी समस्या आहे . मानवाचे आणि इतर जीवांचे जीवन त्यामुळे पणावर लागले आहे . या समस्येचे निदान काढण्या करिता आतापासून पाऊल न उचललेली तर वेळ निघून जाईल.' वराती मागून घोडे ' या स्थितीचा सामना संपूर्ण विश्वाला करावा लागेल . तेंव्हा आपल्याला वेळेवरच जागे व्हावे लागले आणि आपले कर्तव्य बजावावे लागेल.

                            कारखाने, यातायात ची साधने, मानवाचे प्रकृतीला हानी पोहोचवणे किती तरी अशी कारणे आहेत, ज्यामुळे वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण  चरम सीमेवर पोहोचत आहे. त्यामुळे प्राणीमात्र, जीव जंतू यांचा विनाश उद्भवतो. धरणी वरून कांही जिवांचा नमोनिशाण  मिटण्याची वेळ आली आहे .

                             प्रदूषणा करिता अनेक कारणे आहेत त्यापैकी एक कारण प्लास्टिकचा अफाट उपयोग आहे . तीस-पस्तीस वर्षांपूर्वी च्या काळात बाजाराला निघालेली प्रत्येक व्यक्ती , तिच्या हातात पिशवी असे . तुम्हाला काहिंही सामान खरेदी करण्याचे असो , सामान ठेवण्यास पिशवी जरूर घेत. पातळ पदार्थ , द्रव्य पदार्थ खरेदी करावयाचा असला तर त्याकरिता डबा किंवा काचेची बरणी घेऊन निघत असतं .

                   पण सध्याच्या काळांत बहुतांशी लोकांना बाजारात खरेदीला जायचे म्हटले की फक्त पर्स मध्ये पैसे नाही तर क्रेडिट, डेबिट कार्ड असले की निभावते . पिशवीची आठवण येतच नाही . बाजारांत कांही खरेदी केली की दुकानदारास आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या मागतो.तो आम्हाला सांगतो की सरकारने बंदीचे आदेश दिले त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही ठेवत नाही. तरी ही आम्ही त्याला विनंती करतो की मी पिशवी नाही आणली, आम्हाला प्लास्टिकची थैली दे.  दुकानदार पण बुचकाळ्यांत, पडतो जर थैली न दिली तर ग्राहिक जाईल म्हणून तो हळूच पिशवी काढून तुम्हाला देतो .

                                 दोष कुणाचा ? विचार करून बघा . तर प्लास्टिकच्या थैलीने 30 वर्ष 35 वर्ष पूर्वी ची आमची सवय खराब केली. आम्ही पिशव्या घेऊन बाजारात जाणे  विसरलो . आत्ताच्या मुला-मुलींना तर माहीतच नाही बाजारात पिशवी घेऊन जावे लागते. पण प्राणीमात्र ,अनेक जीव आम्ही वापरून फेकलेल्या प्लास्टिकच्या थैल्यांमुळे जीव गमावून बसतात . त्यांचा विचार करून आमची सद्बुद्धी आम्हाला जागे करील असे वाटते . जागे झाले पाहिजे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर निशिध्द झाला पाहिजे.

                 आम्ही सर्व शिकले सवरले , संस्कारी लोक आहोत , तेव्हा या कार्यांत हातभार लावला पाहिजे . जे या प्रदूषणाबद्दल अनभिज्ञ आहेत त्यांना पण समजावले पाहिजे .आमच्या धरणीला प्रदूषण रहित  करण्याकरिता योग्य योगदान देण्यांस सज्ज झाले पाहिजे.हो ,अम्ही सर्व सज्ज आहोत .

 

                        जय हिन्द 

                            अलका पुणतांबेकर देढे

                               बड़ोदरा गुजरात

टिप्पणी/समीक्षा


आपकी रेटिंग

blank-star-rating

लेफ़्ट मेन्यु