पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पर्यावरण आणि प्रदूषण

❀● पर्यावरण दिनानिमित्त लेख ●❀

● पर्यावरण आणि प्रदूषण ●

**पर्यावरण म्हणजे काय?**

पर्यावरण हा एक व्यापक शब्द आहे. मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास  पर्यावरण असे म्हणतात. 
 
पर्यावरणात जल, जंगल, जमीन, हे पर्यावरण त्रिसूत्री, तसेच वायू, जीव जंतू, खनिजे यांचाही समावेश होतो. यात विस्ताराने तलाव, नदी, समुद्र, महासागर, वाळवंट हे देखील येतात. आकाश, ग्रह, तारे, त्यावरील वातावरणाचा होणार परिणाम, हे देखील पर्यावरणाचा विचार करताना अभ्यासिले जाते. 

**प्रदूषण म्हणजे काय?**

पृथ्वीवर स्वस्थ आणि निरोगी जीवनक्रम चालू राहण्यासाठी वरील पर्यावरणाच्या घटकांमध्ये संतुलन असणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा यांच्यामध्ये संतुलन बिघडते, तेव्हा त्याचा थेट परिणाम जीवन, आरोग्य आणि आयुवर होतो. यालाच पर्यावरणाचे प्रदूषण म्हणतात. 

**पर्यावरणाचे प्रकार**

पर्यावरणाचे तीन प्रकार आहेत.
१) भौगोलिक/प्राकृतिक - पृथ्वी, जल, वायू, आकाश, वृक्ष वल्ली, जीव-जंतू आणि हवामान यांना संमिलित रुपात भौगोलिक/प्राकृतिक पर्यावरण समजले जाते. हे मानवाच्या नियंत्रणाबाहेर आहे.
२) सामाजिक - मनुष्याचा परिवार, शेजारी, समुदाय, खेळ, शिक्षण, इत्यादी घटक सामाजिक पर्यावरणात येतात. याचा सर्वात जास्त परिणाम मानवावर होतो.
३) सांस्कृतिक - आपली संस्कृती, रूढी-परंपरा, धर्म, भाषा, जाती, यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे मानव निर्मित वस्तू जसे की इमारती, उपकरणे, वस्तू, मशीन, इत्यादी गोष्टी सांस्कृतिक पर्यावरणात समाविष्ट होतात. हे पूर्णतः मानवाच्या नियंत्रणाखाली आहे.

**पर्यावरण दिन की पर्यावरण दीन**

पर्यावरण दिन की पर्यावरण दीन असे वाटायला लागले आहे, इतका मानवजातीने पर्यावरणाचा ऱ्हास मांडला आहे. एक दिवस तेवढे पोस्टर्स लावायचे, नारेबाजी करायची, कविता करायच्या, कार्यक्रम आयोजित करायचे, झाडे लावण्याचे उपक्रम घ्यायचे, मग पुढे काय? येरे माझ्या मागल्या हेच पुढे होते. लावलेली झाडे जगतात की नाही याचे कोणाला सोयर सुतक नसते. प्लास्टिक विरोधी भाषणे देऊन लोक पुन्हा घरी जाऊन तेच वापरू लागतात. हे बदल समूळ का होत नाहीत, याची कारणे शोधल्याशिवाय पर्यावरण सुधारण्याचे उपाय सापडणार नाहीत.

**प्रदूषणाची कारणे आणि प्रकार**

प्रदूषण हा शब्द इंग्रजीतील "Pollution" या शब्दाचे रूपांतर आहे. याचा अर्थ दूषित अथवा खराब होणे. 

● हवा प्रदूषण 
१) तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे औद्योगिक क्रांती झाली. त्यामुळे विकासाची चक्रे फिरू लागली. झाडे कापून मोठाले कारखाने उभारले गेले. त्यामुळे प्राणवायू जनन कमी होऊ लागले. 
२) कारखान्यांच्या चिमण्या, कोळशावर चालणारी वीज पुरवठा केंद्रे व आगगाड्या, पेट्रोल व डिझेलवर चालणारी वाहने, यातून निघणारा धूर आणि गॅस, खेड्यात चुलीमधून निघणारा धूर, हे सर्व घटक हवेचे प्रदूषण करतात. 
३) शहरांमधून कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधी, माशा वाढवून, साचलेल्या पाण्यातून डासांची पैदास होऊन अनेक आजार पसरतात. 
४) माणूस व पशू पक्ष्यांची मल-मूत्र-विसर्जन-व्यवस्था नीट न केल्यामुळे दुर्गंधी व आजार पसरतात व प्रदूषण होते.
५) बांधकाम व्यवसाय आणि बेकायदेशीर बांधकाम तोडणे यातून प्रचंड प्रमाणात हवेत धूलिकण तरंगत राहतात. वाहनांचे उत्सर्जन देखील त्यात योगदान देते.

● जल प्रदूषण
१) समुद्रातून सामान वाहतूक करणारी जहाजे, किंवा ऑईल टँकर्स उलटून सगळे समुद्राच्या पाण्यात मिसळते अथवा तळाशी जाऊन बसते आणि सागरी जीवांची हानी होते. तसेच अनेक देशातील अतिरिक्त कचरा हा समुद्रात फेकला जातो, त्यामुळे अनेक समुद्री जीव जीवास मुकतात.
२) डोंगरावरील वृक्षतोडीमुळे मातीचा वरचा थर पाऊस आल्यावर वाहून जाऊन नदीत अतिरिक्त माती साचू लागते. त्यामुळे नदीचे पात्र उथळ होऊन पुरांचे प्रमाण वाढले आहे.

● ध्वनी प्रदूषण 
१) रेडिओ, टीव्ही, मोबाईल, याचा अतिवापर आणि सतत व्हिडिओज बघणे, गाणी लावणे याने वैयक्तिक पातळीवर ध्वनी प्रदूषण होते. 
२) वाहनांचे हॉर्न, बस, ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांचे आवाज; कार, रेल्वेगाडी, विमान, हेलिकॉप्टर, आधुनिक मशीन यांच्यामुळे देखील ध्वनी प्रदूषण होते.

● रासायनिक प्रदूषण - जल, अन्न, भूमीवर परिणाम
१) त्याच बरोबर कारखान्यांमधून निघणारे हानिकारक द्रव्ये व रसायने नदीच्या पात्रात सोडली गेल्यामुळे नदीचे प्रदूषण झाले. पिण्यासाठी तसेच अन्न धान्य उगवण्यासाठी शेतात हेच प्रदूषित पाणी जाऊ लागले.
२) नफ्यासाठी अतिरिक्त अन्नोत्पादन करण्यासाठी व दूध, मांस उत्पादन वाढवण्यासाठी अनेक रसायने व हानिकारक पदार्थांचा व हॉर्मोन्सचा वापर केला जातो, ज्यांच्या सेवनामुळे आजार उद्भवतात. त्याच बरोबर, जमिनीचा कस बिघडून त्यात हानिकारक द्रव्ये मिसळली जातात. कित्येक वेळा ती जमीन कोणत्याही अन्नाची पैदास करण्यास अक्षम होऊन जाते. 

● किरणोत्सर्गी प्रदूषण
अणू बॉम्बने किती प्रमाणात किरणोत्सर्गी प्रदूषण होऊन शहरेच्या शहरे नष्ट झाली हे आपण जाणतो. तसेच अणू ऊर्जेवर वीज निर्मिती आणि अणू शस्त्रे निर्माण करणाऱ्या कारखान्यांमधून अपघात होऊन अथवा भूकंपामुळे अशा प्रकारचे प्रदूषण घडते. प्रमाण कमी असले तरी हे प्रदूषण भयंकर विनाशकारी आहे.

● सामाजिक व सांस्कृतिक प्रदूषण
अत्याधिक प्रमाणात जन्संख्येत वाढ झाल्याने नैसर्गिक संसाधनांची कमी भासू लागली आहे. तसेच राहण्यासाठी झाडे तोडून नवीन बांधकाम करून वायू प्रदूषण वाढते आहे. ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्या प्रमाणात ती लावली जात नाहीत.

◆ पर्यावरण सांभाळण्याचे उपाय 

पर्यावरण सांभाळण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर प्रदूषण न करण्यासाठी प्रयत्न करता येतील. प्रदूषणासंबंधी कायद्यांचे नागरिकांसाठी अभ्यास वर्ग नियमितपणे आयोजित केले जावेत, जेणेकरून प्रदूषण रोखण्यासाठी सजगता निर्माण होईल.

● हवा प्रदूषण रोखण्यासाठी
१) सिग्नलवर गाडी उभी असताना इंजिन बंद करावे. त्यातून निघणाऱ्या धुराने असाध्य रोग होतात.
२) मांसाहारी खाणे कमी करावे. यातून प्राण्यांची निर्घृण कत्तल होते, निसर्गाचा समतोल बिघडतो आणि मांस तयार करण्याच्या प्रक्रियेत प्राणघातक वायू बाहेर पडून वातावरण दूषित होते.
३) कचरा जाळू नये. तो व्यवस्थित विल्हेवाट लावण्यास विलगीकरण करून, कचरा पेटीतच टाकावा. कचरा व्यवस्थापनाचे नियम नागरिक व सरकार दोहोंकडून काटेकोरपणे पाळले पाहिजेत.
४) थुंकण्यासाठी सोबत एक भांडे ठेवावे अथवा वाहत्या गटारींचा उपयोग करावा. सगळ्यात श्रेयस्कर बेसिनमध्ये थुंकून बेसिन साफ करणे हे होय. यातून आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो आणि हवेतून पसरणाऱ्या रोगांना आळा बसतो.
५) आनंद, उत्सव साजरा करण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळावा.
६) पेट्रोल, डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांची वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करून घ्यावी जेणेकरून धूर सोडण्याचे प्रमाण नियंत्रित राहील.
७) सरकारकडून सर्व कारखान्यांची वेळापत्रक करून तपासणी केली जावी, जेणेकरून सावधगिरी बाळगली जात आहे व धुराचे उत्सर्जन मर्यादित आहे, याची खात्री व्हावी. औद्योगिक प्रदूषणाचे नियमन काटेकोरपणे बजावले पाहिजे.
८) सौर ऊर्जा, पवनचक्की इत्यादी वापरण्यासाठी सरकारकडून उत्तेजन दिले गेले पाहिजे.
९) वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. सार्वजनिक वाहन व्यवस्था वाढवून सरकारने नागरिकांना प्रोत्साहन द्यावे.
१०) बेकायदेशीर बांधकाम तोडण्याऐवजी तेथे झोपडपट्ट्या हलवून गरीब लोकांचे पुनर्स्थापन करावे. हवा स्वच्छ राहील आणि सामाजिक समता साध्य होईल. 

● जल प्रदूषण रोखण्यासाठी 
१) नदीत कपडे, गुरे धुवू नयेत.
२) निर्माल्य, देवाच्या मूर्ती, कचरा, हे नदी, तलाव, धरण, समुद्रात टाकू नये.
३) सार्वजनिक नळ, विहिरी, तलाव, नदी काठ, येथे कोणताही कचरा टाकू नये.
४) पाण्याच्या पाईप व इतर स्त्रोतांजवळ मल मूत्र विसर्जन तसेच कल्हई करू नये.
४) ड्रेनेजच्या पाण्याचा पुनर्वापर संडासात पाणी ओतण्यास करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याचा अपव्यय टाळता येईल.
५) अंघोळ करताना, तोंड धुताना, धुणे-भांडी करताना, पाण्याचा नळ सतत चालू ठेवू नये. यातून जल संवर्धन होते आणि सांड पाण्याचे कमी व्युत्पन्न होऊन नद्या स्वच्छ राहण्यास मदत होते.
६) बागा, लॉन, शेती इत्यादी ठिकाणी ठिबक सिंचन पद्धती अवलंबावी. यातून जल संवर्धन होते.

● ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी
१) गरज नसताना गाडीचा हॉर्न वाजवू नये.
२) मोबाईल, टीव्ही, संगीत प्रणाली, इत्यादीचा आवाज कमी ठेवावा.
३) शक्यतो लाऊस्पिकरचा वापर टाळावा.
४) लग्न, समारंभामध्ये बँडचा आवाज कमी ठेवावा आणि शक्यतो फटाके वाजवणे टाळावे.
५) इस्पितळाजवळ सार्वजनिकरित्या मोठे आवाज होतील असे टाळावे. तसेच इस्पितळाच्या आवरत भरपूर झाडे लावावीत. ध्वनी व हवा प्रदूषण कमी होते व रुग्णांची मानसिकता सुधारते.

● रासायनिक प्रदूषण रोखण्यासाठी 
१) नदीत कारखान्यातील अतिरिक्त रासायनिक द्रव्ये सोडू नये. फारच गरज भासली तर वसाहतीपासून खूप दूर सोडावी. 
२) अन्न उत्पादन वाढवण्यासाठी पिकांची अदलाबदली करावी. तसेच पिकांच्या कीड नियंत्रणासाठी रसायनांचा वापर करू नये. 
३) प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक साहित्याचा वापर टाळावा. प्लॅस्टिकचा कचरा पाण्यात टाकू नये. 

● भूमी प्रदूषण रोखण्यासाठी
१) ओला कचरा कंपोस्ट करावा. त्यातून निघणाऱ्या सेंद्रिय खताचा रोपे वाढवण्यासाठी उपयोग करावा.
२) कचरा संकलन आणि विल्हेवाट करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे.
३) डोंगर माथ्यावर, उजाड माळरानावर, शहरात प्रत्येक इमारतीच्या भोवती आणि बागांमधून, बस स्थानक, रेल्वे स्थानकाजवळ, रस्त्यांवर मोकळ्या जागेत झाडे लावावीत आणि ती व्यवस्थित जगतील याची काळजी घ्यावी.
४) शेतात निरनिराळी पीके ऋतूनुसार बदलावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचप्रमाणे नैसर्गिक पदार्थांपासून कीटनाशक फवारे तयार करावे.
५) 'वापरा आणि फेका' संस्कृती बाजूला सारून टिकाऊ मालांची संस्कृती आपण अंगिकारली पाहिजे. त्यासाठी वेगळी विपणन धोरणे (marketing strategies) वापरली पाहिजेत.

*निष्कर्ष 
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अनेक उपाय आहेत. फक्त ते सकारात्मकरित्या अवलंबण्याची समाजाची प्रचंड इच्छाशक्ती आवश्यक आहे. आपल्याला स्वार्थी भांडवलशाही, नफा कमावणाऱ्या संरचनेपासून, अधिक संतुलित पर्यावरणीय शाश्वत संरचनेकडे जावे लागेल. यासाठी तुम्ही, आम्ही सगळ्यांनीच एकत्र येऊन आपल्या धरणी मातेला प्राधान्य दिले पाहिजे. 

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.❀● पर्यावरण दिनानिमित्त लेख ●❀

हवा प्रदूषण रोखण्यासाठी
१) सिग्नलवर गाडी उभी असताना इंजिन बंद करावे. त्यातून निघणाऱ्या धुराने असाध्य रोग होतात.
२) मांसाहारी खाणे कमी करावे. यातून प्राण्यांची निर्घृण कत्तल होते, निसर्गाचा समतोल बिघडतो आणि मांस तयार करण्याच्या प्रक्रियेत प्राणघातक वायू बाहेर पडून वातावरण दूषित होते.
३) कचरा जाळू नये. तो व्यवस्थित विल्हेवाट लावण्यास विलगीकरण करून, कचरा पेटीतच टाकावा. कचरा व्यवस्थापनाचे नियम नागरिक व सरकार दोहोंकडून काटेकोरपणे पाळले पाहिजेत.
४) थुंकण्यासाठी सोबत एक भांडे ठेवावे अथवा वाहत्या गटारींचा उपयोग करावा. सगळ्यात श्रेयस्कर बेसिनमध्ये थुंकून बेसिन साफ करणे हे होय. यातून आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो आणि हवेतून पसरणाऱ्या रोगांना आळा बसतो.
५) आनंद, उत्सव साजरा करण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळावा.
६) पेट्रोल, डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांची वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करून घ्यावी जेणेकरून धूर सोडण्याचे प्रमाण नियंत्रित राहील.
७) सरकारकडून सर्व कारखान्यांची वेळापत्रक करून तपासणी केली जावी, जेणेकरून सावधगिरी बाळगली जात आहे व धुराचे उत्सर्जन मर्यादित आहे, याची खात्री व्हावी. औद्योगिक प्रदूषणाचे नियमन काटेकोरपणे बजावले पाहिजे.
८) सौर ऊर्जा, पवनचक्की इत्यादी वापरण्यासाठी सरकारकडून उत्तेजन दिले गेले पाहिजे.
९) वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. सार्वजनिक वाहन व्यवस्था वाढवून सरकारने नागरिकांना प्रोत्साहन द्यावे.
१०) बेकायदेशीर बांधकाम तोडण्याऐवजी तेथे झोपडपट्ट्या हलवून गरीब लोकांचे पुनर्स्थापन करावे. हवा स्वच्छ राहील आणि सामाजिक समता साध्य होईल. 

जल प्रदूषण रोखण्यासाठी 
१) नदीत कपडे, गुरे धुवू नयेत.
२) निर्माल्य, देवाच्या मूर्ती, कचरा, हे नदी, तलाव, धरण, समुद्रात टाकू नये.
३) सार्वजनिक नळ, विहिरी, तलाव, नदी काठ, येथे कोणताही कचरा टाकू नये.
४) पाण्याच्या पाईप व इतर स्त्रोतांजवळ मल मूत्र विसर्जन तसेच कल्हई करू नये.
४) ड्रेनेजच्या पाण्याचा पुनर्वापर संडासात पाणी ओतण्यास करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याचा अपव्यय टाळता येईल.
५) अंघोळ करताना, तोंड धुताना, धुणे-भांडी करताना, पाण्याचा नळ सतत चालू ठेवू नये. यातून जल संवर्धन होते आणि सांड पाण्याचे कमी व्युत्पन्न होऊन नद्या स्वच्छ राहण्यास मदत होते.
६) बागा, लॉन, शेती इत्यादी ठिकाणी ठिबक सिंचन पद्धती अवलंबावी. यातून जल संवर्धन होते.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी
१) गरज नसताना गाडीचा हॉर्न वाजवू नये.
२) मोबाईल, टीव्ही, संगीत प्रणाली, इत्यादीचा आवाज कमी ठेवावा.
३) शक्यतो लाऊस्पिकरचा वापर टाळावा.
४) लग्न, समारंभामध्ये बँडचा आवाज कमी ठेवावा आणि शक्यतो फटाके वाजवणे टाळावे.
५) इस्पितळाजवळ सार्वजनिकरित्या मोठे आवाज होतील असे टाळावे. तसेच इस्पितळाच्या आवरत भरपूर झाडे लावावीत. ध्वनी व हवा प्रदूषण कमी होते व रुग्णांची मानसिकता सुधारते.

रासायनिक प्रदूषण रोखण्यासाठी 
१) नदीत कारखान्यातील अतिरिक्त रासायनिक द्रव्ये सोडू नये. फारच गरज भासली तर वसाहतीपासून खूप दूर सोडावी. 
२) अन्न उत्पादन वाढवण्यासाठी पिकांची अदलाबदली करावी. तसेच पिकांच्या कीड नियंत्रणासाठी रसायनांचा वापर करू नये. 
३) प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक साहित्याचा वापर टाळावा. प्लॅस्टिकचा कचरा पाण्यात टाकू नये. 

भूमी प्रदूषण रोखण्यासाठी
१) ओला कचरा कंपोस्ट करावा. त्यातून निघणाऱ्या सेंद्रिय खताचा रोपे वाढवण्यासाठी उपयोग करावा.
२) कचरा संकलन आणि विल्हेवाट करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे.
३) डोंगर माथ्यावर, उजाड माळरानावर, शहरात प्रत्येक इमारतीच्या भोवती आणि बागांमधून, बस स्थानक, रेल्वे स्थानकाजवळ, रस्त्यांवर मोकळ्या जागेत झाडे लावावीत आणि ती व्यवस्थित जगतील याची काळजी घ्यावी.
४) शेतात निरनिराळी पीके ऋतूनुसार बदलावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचप्रमाणे नैसर्गिक पदार्थांपासून कीटनाशक फवारे तयार करावे.
५) 'वापरा आणि फेका' संस्कृती बाजूला सारून टिकाऊ मालांची संस्कृती आपण अंगिकारली पाहिजे. त्यासाठी वेगळी विपणन धोरणे (marketing strategies) वापरली पाहिजेत.

*निष्कर्ष 
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अनेक उपाय आहेत. फक्त ते सकारात्मकरित्या अवलंबण्याची समाजाची प्रचंड इच्छाशक्ती आवश्यक आहे. आपल्याला स्वार्थी भांडवलशाही, नफा कमावणाऱ्या संरचनेपासून, अधिक संतुलित पर्यावरणीय शाश्वत संरचनेकडे जावे लागेल. यासाठी तुम्ही, आम्ही सगळ्यांनीच एकत्र येऊन आपल्या धरणी मातेला प्राधान्य दिले पाहिजे. 

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन

तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू