पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अमर प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं कदाचित सेम नसतं , प्रेमाला उपमा नाही !!!! असे बरंच काही आपण ऐकलं असेल. प्रेमात पडणं हे अगदी नकळत असतं सोलवा साल हे वय असं असतं की आयुष्यात ते दिवस परत कधीच येत नाहीत. आजची ही कथा अशाच सोलवा साल वयात सुरू झालेली परंतु शेवटच्या श्वासापर्यंत टिकलेली अशी आहे.


 ही कथा आहे एका जोडप्याची जी सुरू होते का वृद्धाश्रमातून वृद्धाश्रमातून काय प्रेम कथा होईल असा आपणास प्रश्न पडला असेल परंतु ही कथा आहे डिमेन्शिया या आजार असणाऱ्या बाईची आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या तिच्या नवऱ्याची.


रवी आणि प्राजक्ताचे वृद्धाश्रमात असलेली. प्राजक्ता दिमेन्शिया या आजाराने ग्रस्त असते. त्या वृद्धाश्रमात नेहमी येणारे डॉक्टर जेव्हा प्राजक्ताला तपासत तेव्हा बऱ्याचदा ती तिच्या डॉक्टरांना देखील ओळखत नसे.  रवी आपल्या (प्रेयसी नंतर) पत्नी झालेल्या प्राजक्ताच्या एक मित्र म्हणून नेहमीच जवळपास राहत असे. परंतु प्राजक्ता त्याला देखील ओळखत नसे. वृद्धाश्रमात खूपदा त्यांची मुले त्यांना येऊन भेटत असत आणि नेहमी म्हणत असत की आपलं घर मोठ आहे आपण आई म्हणजेच प्राजक्ताला वेगळी खोली देऊ पण तुम्ही वृद्धाश्रमात नका राहू !!!!! परंतु रवी त्यांना नेहमी म्हणत असे की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या प्रेयसी सोबतच राहीन. बरेच दिवस जातात आणि प्राजक्ताची स्थिती खालावत जाते. हळूहळू ती सर्वांनाच विसरू लागते. 


 एके दिवशी रवी वृद्धाश्रमातल्या केअर टेकर ला सांगतो की मला प्राजक्ताला एक गोष्ट सांगायची आहे. केअरटेकर प्राजक्ताला सांगते की रवी खूप छान गोष्टी सांगतो, तो रोज तुला गोष्टी सांगत जाईल तर तू रोज सकाळी त्याच्या जवळच बसत जा, असे म्हणून ती रवी कडे प्राजक्ताला घेऊन जाते.


रवी जरी तिच्या नवरा असला तरी दिमेन्शिया मुळे ती त्याला देखील ओळखत नसते,  शेवटी तिची समजूत काढून प्राजक्ताला गोष्ट ऐकण्यास तो तयार करतो. रवी गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो एक श्रीमंत मुलगी असते तिचं घरदार इतक श्रीमंत असतं की घरी काहीच तिला कमी भासू दिली जात नाही. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत तिचं ठरलेली अशी दैनंदिनी ठरलेली असते आणि त्यात बदलण्या सारखे काहीच नसते. त्या दैनंदिनीमुळे तिला काहीच वेगळं अस जीवन जगता येत नसतं. 


कॉलेजमध्ये गेल्यावर तिला एक मित्र भेटतो तो गरीब असल्याने एका जवळच्या फॅक्टरीत काम करत करत शिकत असतो आणि वेळ मिळेल तसा अभ्यास करतो.  एके दिवशी हे दोघेही सोबत चालत चालत घरी जाण्यास निघतात आणि काही काम उरकून घरी जायचे ठरवतात.  काम उरकण्यात वेळ झाल्यामुळे दोघेही सोबतच घरी जाण्यास निघतात. रस्त्यात  ते दोघे खूप गप्पा मारत असतात. तो तिला छोट्या छोट्या क्षणांचा आनंद कसा घ्यायचा हे जाणवून देत जातो आणि आणि अखेरीस तिला जाणवतं की श्रीमंत असून सुद्धा एका पिंजरा धडकलेल्या पक्षापेक्षा तिची वेगळी काही स्थिती नाही. हळूहळू त्याच्या स्वच्छंदी वागण्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडू लागते त्याच्याशिवाय जगण्याचा विचार देखील करत नसते. या दोघांमधील जवळ एक पाहून तिच्या आई-वडिलांना थोडं खटकू लागतात ओके फक्त वयाच्या ओघात जवळ आले आहेत असे त्यांना वाटू लागते आणि अखेरीस तिचं कुटुंब त्यांना भेटण्यास मनाई करत आणि लवकरच तिचा साखरपुडा एका श्रीमंत मुलासोबत ठरवला जातो.


साखरपुडा होतो आणि काही दिवस जातात व ती हळूहळू तिच्या आधीच्या मित्रास विसरू लागते. तो मित्र तिला बरेच पत्र पाठवतो (जरी ते एका शहरात राहत असले) तरी तो फक्त पत्र व्यवहाराने त्यांच्याशी संपर्क ठेवायचा प्रयत्न करतो, पण त्याचे आलेले सर्व पत्र आई त्या मुलीला कधीच मिळू देत नाही.  एका दिवशी इतक्या साऱ्या पत्रांचा काहीच उत्तर नाही आलं त्यामुळे ही मुलगी आपणास विसरली असे समजून तो ते शहर सोडण्याचा विचार करतो आणि शहर सोडून निघून जातो. 


काही महिने उलटतात ती आपल्या आई वडील आणि होणाऱ्या नवऱ्यास सांगून दुसऱ्या शहरात काही कामानिमित्त जाते संयोगाने त्याच ठिकाणी तिला तिचा जुना प्रियकर भेटतो  आणि त्यावेळेस तिच्या प्रियकर त्यांनी पाठवलेल्या पत्रांबद्दल उल्लेख करतो पत्रांचा विषय निघताच हैराण झालेल्या तिला हे जाणवू लागते की कदाचित ते पत्र मुद्दामच तिच्यापर्यंत पोहोचले नसावीत.


 ती त्याला म्हणते की कदाचित हे पत्र मला आधी मिळाले असते तर मी त्या मुलाबरोबर साखरपुडा केलाच नसता तेच आपलं पहिलं प्रेम भेटल्यानंतर दोघेही काही दिवस सोबत वेळ घालवून आपापल्या शहरात परततात, पण एकमेकांची ओढ शेवटी त्यांना पुन्हा वाटू लागते. अखेरीस ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यास आधीच्या आयुष्याबद्दल सांगते आणि त्याला हे जाणून द्यायचा प्रयत्न करते किती अजून सुद्धा तिच्या प्रियकरास प्रेम करते. हे सर्व ऐकल्यानंतर तिचा नवरा खूप समजूतदारी दाखवतो आणि तिच्यासोबत झालेला साखरपुडा मोडण्यास तयार होतो. त्यानंतर ते पुन्हा त्या शहरात जाते जिथे तिचा प्रियकर राहत असतो त्याला घेऊन ती आपल्या आई-वडिलांकडे येते आणि आई-वडिलांची समजूत काढायचा प्रयत्न करते अखेरीस मुलीच्या हट्ट भरीस पडून आई-वडील त्यांचे लग्न करण्यास तयार होतात.


 हे सर्व कथा ऐकत असताना प्राजक्ता रवीला म्हणते की पुढे काय होतं ? रवी म्हणतो की तो लग्न करण्यास तयार होतात व एकमेकांसोबत खुश राहू लागतात. 


प्राजक्ताला हे सर्व तिच्याशीच निगडित असल्याचे भासू लागते.  तिला जाणवते की आमचं असंच काहीसं तिच्या आयुष्यात देखील झाले आणि शेवटी रवी हा आपलाच नवरा आहे हे तिला लक्षात येऊ लागते. म्हातारपणात आल्यावर आपण समोर आहोत हे जाणून ती रवीला गळे भेटते आणि त्याला म्हणते " राजा आपण आयुष्य एकत्र राहू शकतो  का ? जगाचा जर निरोप घेऊ तर तो सुद्धा सोबतच घेऊ, मला हे वचन देशील का ? " रवीचे डोळे भरून येतात आणि तो तिचा हातात हात धरून तिला वचन देतो. त्या रात्री पहिल्यांदाच त्या वृद्धाश्रमात ते एकाच खोलीत झोपतात. सकाळ होते तेव्हा वृद्धाश्रमाची केअरटेकर त्यांना उठवण्यासाठी परंतु दरवाजा उघडतात हे दोघे हातात हात घातलेले परंतु थंड थंड हात असणारे जाणवू लागतात. केअर टेकर हे सर्व पाहून डॉक्टरांना बोलावते आणि डॉक्टर त्यांना सांगतात की हे दोघेही आता ह्या जगात राहिले नाहीत.


केअर टेकर हे सर्व पाहून ओक्साबोक्शी रडू लागते. कदाचित अमर प्रेम काय असतं हेच हे जोडपं सर्वांना शिकवून गेल असतं.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू