पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

आई, 
हात थरथरतो माझा
स्वर्गीय तुला लिहिताना
पण सत्य तेच आहे
हे रुचत नाही मनाला

माता पिता काय सखे सोबती
कां आजीवन पुरले कुणाला?
जीवन सत्य हेचि आहे
कठीण होते आत्मसात कराया

मॄत्यू अटळ ,हे सत्य
विदीत सर्वाना
तरी जीवन मोह कां
सुटला कुणाला?

क्षण भंगूर ह्या जीवनाची
आस मनी भारी
शेवटच्या श्वासापर्यंत वाटते
मॄत्यू परतेल माघारी

ना असे झाले ना होणार कधी
तू ही मला सोडून गेली
हात माझा जरी होता
तुझ्याच हाती

मातॄदिनाचे नमन तुजला
जशी जगले आजवरी
सद् विवेक, सरळ आचरण
सूपंथ लाभला जीवनाला
उर्वरित जीवन असेच लाभो
स्वर्गातून दे हेची आशिष मजला

तुझी लेक
सौ. विद्या
(सौ.स्वाती दांडेकर)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू