पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रबुद्ध सकारात्मक विचारांचे प्रस्तुतीकरण म्हणजे नजर

#नजर - अर्थात प्रबुद्ध विचारांचे सकारात्मक, विचारणीय प्रस्तुतीकरण. सामान्य जीवन जगताना आसपासच्या गोष्टींकडे आपण कसे पाहू शकतो, त्या मधून काय शिकू शकतो, त्याचा आपल्या व्यक्तीगत जीवनात काय प्रभाव होतो अशा अनेक गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडणारा हा संग्रह आहे. 'लाल फुलांच्या फांदीवर' ह्या मध्ये वर्तमानात राहून आपण किती सहज आयुष्य जगू शकतो हे पक्षांकडून कळते. मला पण एक प्रश्न नेहमी पडतो की मनुष्य प्राणी ज्याच्या जवळ वाणी आहे, बुध्दी आहे, ईश्वर प्रदत्त देणगीने समॄध्द असून ही आपल्या प्रत्येक दु:खात अधीर होऊन आपले दु:ख दुसऱ्यांसमोर मांडत असतो मग हे मूक प्राणी आपल्या वेदना कसे सहन करतात? ईश्वरावर विश्वास ठेवूनच नां? मग आपण कां नाही? . 

संक्रांत वही.... मध्ये हलव्याचे दागिनेचा विचार मनात रूजला. कॄष्ण समजला कुठे? सुंदर. जर तो समजला तर जीवन खूप सहज, सुंदर आणि कर्मवीर होऊ शकते. "भारत मात की जय" ह्यात देशप्रेमाची व्याख्या खूप सटीक आणि अर्थपूर्ण वाटली. लहानपणीची जीभेवर रेंगाळणारी 'चव' पुन्हा नव्याने जाणवली. "राधेय" कर्णाचे व्यक्तिचित्र प्रत्येक काळात प्रासंगिक असून असे कां? हा चटका मनाला देऊन जाते. "हसू डोळ्यातून सांडलं" ही एक भावनिक अभिव्यक्ती आहे तर ह्या आपाधापिच्या जीवनात एका सुस्वर पहाटे ची, जी काळाची नितांत गरज आहे. क्षणभर विश्रांती हवी आहे. बाप्पांची अभिलाषा अगदी रास्त आहे. लोकमान्यांची भावना डावलून त्यांचे विद्रूप स्वरूप समाजात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिकणे व करणे सर्व वयोगटातील लोकांना आवश्यक आहे. हे विचार तंतोतंत समर्थनीय आहे. 

माझे जगणे राहून गेले. सर्व सामान्य लोकांना पडणारा, त्याचे उत्तर अद्याप न सापडलेला प्रश्न. आम्हाला असे काय करायचे होते? ह्याची खंत सुखाने जगू देत नाहीये आणि सर्व सम्पन्न असून सुद्धा कायम कमतरता जाणवते. मला वाटते शेवटच्या श्वासापर्यंत ही व्यथा अनुत्तरितच राहते.  

पुस्तकाचा प्रारंभ वर्तमानात जगण्याची शिकवण देतो तर शेवट जीवन जगण्यावरच प्रश्न चिन्ह लावतो. नेमके काय हरवले अन् काय राहिले? 

ऋचा, पण मला ही उत्सुकता आहे की इतक्या लहान वयात विचारांची इतकी प्रगल्भता कशी आली आणि हे व्यक्तिमत्व घडवणारे तुझे आई वडील ह्याचा भाग अधिक आहे. 

तुझ्या ज्योतीर्मय जीवन आणि लेखना साठी खूप खूप शुभेच्छा. 

सौ. स्वाती दांडेकर

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू