पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रतिक्षा-मीरेची

प्रतिक्षा-मीरेची


मंदमंद बासरीचा 

उत्तुंग धुंद स्वर ही तो,

नंदनंदना मला

गोकुळात भुलवितो।


प्रतिक्षेत रात मी

घालवू आता कशी,

स्वर्गीय बासरीसवे

एकरुप होऊ कशी ?


सुप्रभात सुखकर ती

धेनु बघ हंबरती,

कान्ह्याविना मिरेला ह्या

ना दिसे अन्य गती।


रातदिन कर्णी माझ्या

वाजे श्रीकृष्णाची बासरी!

शोधु कुठे कान्ह्या तुला

झाले मी रे बावरी।


नयन तुझे जादुगार

मनासी नित्य मोहविती,

निलकांतीयुक्त तुला

मनात नित्य शोधिती।


प्राणधना येई रे

आर्त मी हे आळवीते,

हृदस्पंद मंद छेडुनी

तुझीच मीरा विनविते।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू