पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निसर्गरम्य कोकण

निसर्गरम्य कोकण , प्रकॄतिक सौन्दर्याने सजलेली, नारळ, पोफळीच्या बागांनी बहरेलं, डोळ्यात साठवून घेण्याचा किती ही प्रयत्न केला तरी ही मन कायम अतॄप्तच ठेवणारी ही देवभूमी, परशुराम भूमी कायमच आपल्या कडे आकॄष्ठ करत असते. कोकणातील कोणता ही भाग असो चिपळूण असो वा रत्नागिरी या तळ कोकण आपली प्राकृतिक वैशिष्ट्ये, पुरातन मंदीरे, इतिहासकालीन किल्ले जसे सिंधूदुर्ग, मुरुड जंजिरा आदी. आज ही तिथे पाऊल ठेवता क्षणी "जय भवानी, जय शिवाजी" असे उद्गार आपसुकच येतात आणि महाराजांच्या समोर नतमस्तक व्हायला होत . तसेच आपल्या कर्तृत्वाने अमरत्व प्राप्त केलेले अफाट व्यक्तीमत्व महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक , मामा मुजुमदार अशा अनेक विभूतींची जन्मभूमी आणि कर्मभूमी चा मान लाभलेली ही पावन माती मराठी माणसा साठी भूतलावरील जणू स्वर्गच आहे.

आताच पुण्याहून 350 कि. मी. दूर असलेल्या कोकणातील हिल स्टेशन आंबोली येथे जाण्याचा योग आला. छोटसं टुमदार गांव, प्राकृतिक सौन्दर्याने परिपूर्ण, शांत, प्रसन्न वातावरण, जी आजच्या काळाची नितांत गरज आहे, आज भौतिक सुखाची काही वाण नाही ये, 'टाळी वाजली की हजर' अशी सुबत्ता असून ही मानसिक शांतता, समाधान हरवले आहे आणि हे समाधान मिळते ते फक्त प्रकॄतिच्या सान्निध्यात.

आम्ही थांबलेल्या ठिकाणाहून गांव थोडे दूर असून प्रकॄतिच्या सान्निध्यात होते, 'रेन हिल्स ', उत्तम व्यवस्था, चविष्ट जेवण आणि सरळ सहज माणुसकीचा व्यवहार असलेली माणसे लाभल्याने प्रवास सुखकर अन् मनात रुजणारा झाला.

आंबोली मधील हिरण्यकेशी देवी चे मंदिर आणि तेथील नदी सोबत चालणारी पायवाट अलौकिक आनंद देणारी होती. (लेखा सोबत तेथील फोटो ही देत आहे). "कावळे साद पाॅईंट " अशा सूरम्य जागी भेट देताना, कुडाळ शहरा जवळ, मालवणच्या मार्गाने देवबाग बीच ला जाताना काळसे गांवातील एका छोट्याशा आईस्क्रीम च्या दुकानात शिरलो अन् शिरताच स्वच्छ शेणाने सारवलेल्या अंगणाने माझे स्वागत केले. मनाला अप्रतिम आनंदाची अनुभूती झाली. माझी आईस्क्रीम खाण्याची ईच्छा दूर राहीली अन् मी त्या आवारात माहेरवाशीणी गत भिरभिरायला लागले. झाडाच्या सावलीत मातीचा उंचवटा करुन बसायला केलेली जागा अतिशय सुबक व नीटनेटकी तेथील जमीन मातीने सारवलेली, पाण्याचा माठ पूर्ण रुपाने प्रकॄति चे सामीप्य , मला पन्नास वर्षे भूतकाळात घेऊन गेले, माहेर ची आठवण झाली "मोडके माझे घर कौलारू".

काय बाळ, काय खाशील? बेलफळाचे आईस्क्रीम देऊ? की जास्वंदी चे सरबत. ह्या प्रेमळ हाकेने मी भानावर आले, माझ्या समोर माझ्या आईच्या वयाच्या 82 वर्षाच्या आजी उभ्या होत्या. नववारी लुगडे, शांत व प्रेमळ चेहरा आपसूक मी नमस्कारा साठी वाकले.

आजींनी मला त्यांच्या दुकानाची माहिती दिली.

आजीवन कोकणात वास्तव्य केल्याने तेथील उपलब्ध वस्तूंनी घरघुती उत्पादने करण्यास सुरुवात केले आंबा, फणस वडी, कोकम या अन्य सरबते, हळद व फणसाचे लोणचे, , घरच्या तिला मध्ये केलेले कुळीथ लाडू, शुध्द खोबरेल तेल,गावातील कारागीरांनी नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या हस्तकला,रिसायकल मातीपासून बनवलेल्या छोट्या सुबक गणेश मूर्त्या अशी विविध हस्तशिल्प आपल्या स्टोअरमध्ये उपलब्ध करून ठेवतात,ज्यातून ग्रामीण अर्थकारणा चालना मिळते आणि कारागीरी जपली जाते. बेलफळ आणि रसाळ फणस या कोकणातील दुर्लक्षित फळांपासून गावातील म्हैशीच्या दुधात बनलेलं नॅचरल आईस्क्रीम देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

आजींची एक गोष्ट मला खूप आवडली की त्यांच्या घरघुती शुद्ध वस्तूंनी शरीराला कसा फायदा होतो उदा. जास्वंदीच्या सरबताने पोटासाठी व केसांना फायदा होतो आणि ह्या वस्तूंचा वापर करून आपल्याला औषधां पासून दूर कसे राहता येईल हे उत्तम प्रकारे समजवले. आजचा धावत्या युगात आपण मागील पिढी चे हे अनमोल ज्ञान घेण्यास वंचित होत आहोत ही जाणीव झाली. ह्या वैद्यकीय वारसा जोपासायला हवा.

अशा ह्या आजींचे नांव आहे "पुष्पलता आजगावकर" आणि त्यांच्या कॅफे चे नाव आहे "आजगावकर आजी'च कॅफे "आणि हो त्यांचा लोगो सुध्दा खूप आकर्षक आहे. आजी जात्यावर दळत आहे.

आपल्या तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजिका असून त्याच्या नातवाने त्याचा गॄह उद्योग विदेशात ही पोहचवला आहे. आजी सर्व वस्तू स्वत करतात आणि त्यांचे सून मुलगा मदत करतात.

निघताना आजी म्हणाल्या पदार्थ आवडले तर फोन कर आणि नाही आवडले तरी ही कर कारण मग मला आवश्यक बदल करणे सोपे होईल. आजच्या भाषेत मार्केटिंग स्कीलचे उदाहरण मला मिळाले.

आजीची कार्य क्षमता, नवीन बदलाचा हुरूप, आपल्या उत्पादनां विषयी खात्री आणि सर्वात महत्त्वाचे की ह्या वयात ही काही करून दाखवण्याची जिद्द ते पण उपलब्ध संसाधनात, लहानशा गावात, जिथे आधुनिक सुख सुविधा अपेक्षाकॄत कमीच आहे तरी ही आपला व्यवसाय वाढवणे हे खूप कौतुकास्पद आहे. तसेच मनाला उभारी देण्यासाठी, पुढे वाढण्यास आत्माबळ देते.

त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

आजी माझ्या मनात जशा कायम राहणार आहे तश्या तुमच्या वाचकांच्या मनात ही राहो त्या साठी त्याचा फोटो तसेच कॅफे चा फोटो फोन नंबर व पत्ता देखील देत आहे. जेव्हा कधी मालवण भागात जाल तेव्हा आजींना अवश्य भेटा. आजींन कडे कुरियर व्यवस्था आहे.

आजगांवकर आज्जीज इको स्टोअर.
मु.पो.काळसे,ता.मालवण,
जि.सिंधुदुर्ग -416605
फोन नंबर 7588902953

सौ. स्वाती दांडेकर
इंदूर
फोन नंबर 9425348807

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू