पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आंस तुझ्या दर्शनाची

भक्ती रचना 

आंस  तुझ्या दर्शनाची



देवशयनी  एकादशी

विठू पूजन चातुर्मासी


विठू उभा राउळी

बघे भक्तांची मांदियाळी


सुखावे, पहाता भक्त मेळा

रंगला दर्शन सोहळा


भक्त चंद्रभागे तिरी

मनोभावे स्नान करी.


ताल चिपळ्या मृदुंगाचा

जथ्था नाचे वैष्णवांचा


घोष, रामकृष्ण हरि

दुमदुमे पंढरी नगरी


तुळशी माळ,हाती फुले

बारीतून रांग चाले


आस विठूच्या दर्शनाची

 त्या सावळ्या परब्रह्माची


मनी उमडे प्रेम भक्ती

देवा देई आम्हा मुक्ती


चालत आलो इथवर

दर्शन व्हावे,कृपा कर

 

सावळे सुंदर रूप पाहूनी 

धन्य झालो,पाणावलो लोचनी.


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू