पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नामस्मरण

।। श्री राम समर्थ ।।

सद्गुरू कृपेने नामस्मरण करत असतां वेळोवेळी झालेल्या " जाणिवा "

 

     ।। श्री राम ।।

चुकांचे डोंगर पापांच्या राशी ।

तरी वांछितेस ग मुक्ती कशी ।।

नव्हे सुटका भोगल्या विणा ।

परी राम समर्थ आहे जाणा ।।

 

चुकांचे डोंगर पापांच्या राशी ।

 जरी आहेत पाठीशी ।।

परी देऊनी अनुग्रहे सद्गुरू ।

मज लाविले नामस्मरणाशी ।।

 

चुकांचे डोंगर पापांच्या राशी ।

समर्पुनी सर्व गुरू चरणांशी ।।

आता स्वतंत्र, मुक्त, निश्चयी ।

होण्यास लीन सद्गुरू चरणी।।

 

सोबत आहे सद्गुरूंची ।

नव्हे चिंता आता कशाची।।

देऊनी रामनाम मुखी ।

ठेविले सद्गुरू आम्हां सुखी ।।

 

घेऊनी कर्माचा ढिगारा ।

परतोनी जन्मासी आला ।।

आणि म्हणे देवाला ।

सुख हवे मला ।।

 

ना मनाची स्थिरता ।

ना बुद्धीची एकाग्रता ।

ना चित्त सोडे चंचलता ।

ना वृत्ती सोडे विकलता ।

ना सद्गुरू चरणी लीनता ।

ना रामनामी तल्लीनता ।

मग कशी मागतेस "मुक्तता"।।

 

देहबुद्धीत जगणारा "जीव"।

आत्मबुद्धीत जगणारा"शिव"।।

आत्मबुद्धीत स्थिरावणारा"सदाशिव"।

आत्मबुद्धीतच रमणारा "राम"।

जो देतो सर्वांना "पूर्ण विराम"।।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू