पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बेस्ट ऑफ जर्नी

गेले काही वर्षांपासून कुणीही कुठल्याही प्रवासाला जात असताना त्यांना Best of journey म्हणायची पद्धत आहे.

किती छान आहे न हे की "तुमचा प्रवास आनन्दाचा आणि सुखरूप(सुरक्षित)होवो" ह्या शुभेच्छा प्रवासात सोबत असणं. ह्या वरून विचार आला की आयुष्याच्या महत्वपूर्ण टप्प्यांवर पण अश्या शुभेच्छा मिळत राहिल्या तर आयुष्याचा प्रवास पण काही प्रमाणात सुसह्य होईल. अगदी आयुष्याची सुरुवात म्हणजे स्त्रीला जाणवले की ती आई होणार आहे तेव्हां पासून तिने आपल्या बाळाला रोज Best of journey म्हणावं

जन्माला आल्यानन्तर आईसोबत बाबा ने ही Best of journey म्हणावं. पुढे शाळा/कॉलेजात शिक्षकांनी Best of journey म्हणावं, नोकरी च्या ठिकाणी वरिष्ठांनी Best of journey म्हणावं. लग्न सोहळ्यात गुरुजी आणि सर्व जमलेल्या स्वजनांनी Best of journey म्हणावं. खरं तर आपल्या संस्कृतीत आशिर्वाद देणें म्हणजे हेच आहे पण नवीन पिढीला त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणून हा खटाटोप.

आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे परतीचा प्रवास त्यावेळी Best of journey सोबत Safe flight पण जरुरी आहे म्हणजे काय तर पुढे आत्म्याचा प्रवास ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही पण ऐकून, वाचून जे थोडं माहीत झालं आहे त्याप्रमाणे तो प्रवास जास्त अवघड असतो त्यावेळी तर ह्या शुभेच्छांची जास्त आवश्यकता असते. पूर्वी अंतिम वेळी मुखात गंगा,तुळस ठेवणे म्हणजे ह्या शुभेच्छा देणेंच होय असं मला वाटतं.

ह्याच सोबत Shopizen च्या माझ्या सहप्रवाश्यांना आणि सर्व वाचकांना आपापल्या प्रवासा साठी   Best of journey .

 
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू