पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

टमाटर

टमाटर


आंब्यापेक्षा भारी टमाटर

दिसते बघा कसं लाल

त्याचे भाव पाहून माणसाचे

    होते बघा लई हाल ….


टमाटर ही झाला  श्रीमंत

बसला सफरचंदाच्या  बैठकीत

तोरा मोरा दाखवत

लावून भांडण बघतो ऐटीत ….


बिना टमाटरची भाजी

होते आता घरोघरी

आता कळली तुझी किंमत

चव नाही तुझ्याशिवाय खरी ….


स्वप्नात येऊन सांगतो टमाटर

थोडा लगाम दे तोंडाले

सारेच कमावते इथे

थोडं कमावू दे कास्तकाराले ….


      सुरेखा नंदरधणे ✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू