पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आला आला पाऊस

आला आला पाऊस!


आला आला हा पाऊस

मन माझे आनंदले

माझ्या सवे धरेचेही

मन प्रफुल्लित झाले!


माझ्या कवितेचे भाव

होते बघा हो रुसले

आजच्या या पावसाने

तरंग हे उमटले!


अक्षर,शब्द नाचत

काव्य नवे हो स्फुरले

त्यातील या गोडव्याने

मनी मज हसविले!


नभी गर्जता मेघ

धरेवरी बरसले

काव्य माझे या ओठात

चिंबचिंब हो भिजले!


या सृष्टिस भिजवूनी

कसे उल्हासित केले

सर्व माझ्या कवितेने

इतंभूत हे रेखाटिले!


काव्याच्या  जादूगरीने

मनोमनी हो हर्षिले

रसिकांना अर्पूणीते

सार्‍यांना कसे भावले!



सौ.छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू