पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कवी चिमणी

कवी(चिमणी)


पहिली कविता

येते बाळा कानी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


कविची कल्पना

रुतली या मनी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


अफाट हे विश्व

घरट्याची गाणी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


दाणे तरी घेना

करी विनवणी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


रंग भूरकट

चोचीत हे पाणी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


तूच तर गाते

पहाटची गाणी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


वाट पाही सृष्टी

सडा ही टाकुनी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


शब्दाचे हे पेव 

फुटे कवीमनी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


कवितेचे जग

शब्द सुमनांनी

चिवचिव करी

गोड ही चिमणी!


सौ.छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू