पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुन्हा पुन्हा नभ दाटून येती

पुन्हा पुन्हा घन दाटूनी येती
पुन्हा पुन्हा ते गड गड करती
पुन्हा पुन्हा या धरणीवरती
मोर पिसारे फुलवून नाचती...(१)

पुन्हा पुन्हा घन दाटूनी येती
पुन्हा पुन्हा ते मल्हार गाती
पुन्हा पुन्हा ते पद आठवती
जणू प्रेमपद गा वे तिच्या सोबती...(२)

पुन्हा पुन्हा घन दाटूनी येती
पुन्हा पुन्हा ते चिंब भिजवती
पुन्हा पुन्हा ते क्षण आठवती
जसा रमतो मी माझ्या प्रीती...(३)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू