पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आखूड शिंगी बहु दूधी आणि अल्प मोली

 

आखूड शिंगी, बहु दूधी आणि अल्प मोली

 

विषय थोडा समजायला वेळ लागला. पण विचार केला तेव्हा सहजच ओठावर हसू आले. माणूस हा अल्प संतुष्ट प्राणी आहे. त्याच्या जीवनात कितीही  चंगळ असली तरी माझा मंगळच सुरू आहे अशी विचारसरणी असते. पण कुठेतरी ह्याला मर्यादा घालने आवश्यक आहे. नाहीतर एक दिवस आपल्याजवळ वस्तूंचा संचय खूप असेल परंतू  आत्मिक समाधान तेवढं राहणार नाही. 

   

 एक पालक म्हणून विचार केला तर, लहान असतांना आपली मुलं एखाद्या गोष्टीचा हट्ट करतात तेव्हा आपण फार काही विचार न करता त्यांचा हट्ट पूर्ण करुन त्यांना आनंद मिळेल असे वागतो. परंतु काही काळाने मुलांना त्याची सवय होऊन जाते. त्यांचे हट्ट पूर्ण होतातच ह्याची खात्री होते आणि त्यांची लिस्ट सतत तयारच असते. मग पालक "तो/ती" ऐकतच नाही म्हणून त्याचे डिमांड पूर्ण करु लागतात. आणि मग एक वेळ अशी येते की आता ह्याला " नाही" कसं म्हणू शकतो ह्याचा पालक विचार करतात. 

 

तेव्हा मात्र वेळ त्यांचा हातून निसटून गेली आहे ह्याची जाणीव त्यांना होत नाही. मग "आखूड शिंगी, बहु दूधी आणि अल्प मोली" हे मुलांना समजावून सांगणे अवघड होऊन बसते. तेव्हा वेळीच सावध होऊन मुलांना एखादी वस्तू आणून ती उपयोगी किती आहे किंवा किती नाही याची जाणीव करून देणे आणि वस्तू आणून संचय करण्यापेक्षा " तू तुझे जूने झालेलं आधी काढून बाजूला ठेव मगच नवीन वस्तू आणून मिळेल"असा नियम बनवला तर नक्कीच आपल्या पिल्लुंच्या आयुष्यात 'जगमे मंगल ही मंगल होईल' ह्यात शंका नाही.. नाही का??

 

©® नेहा खेडकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू