पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हॉस्टेल (भाग १)

       होस्टेल (भाग १)


   " स्टॉपिट रेवा "  जोशी गुरुजी रेवावर ओरडले . तसाच डान्स थांबवला गेला .सर्व  आश्चर्याने बघु लागले . अचानक असे काय झाले की डान्स चालू असताना जोशी गुरुजी रेवावर  ओरडले .


        ही कहाणी आहे ऐका लेडीज होस्टेल मधली . शाळेच्या या

काही अंतरावर ऐक लेडीज होस्टेल होते होस्टेल तसे बरेच जुने होते तिथे बऱ्याच मुली लांबून शिकायला आल्यामुळे होस्टेल वर राहायच्या .


    पण काही दिवसांपूर्वी सोनल नावाची मुलीचा होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून  मृत्यू झाला होता . तेव्हापासून मुलीच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .


     मागील दोन महिन्यात चार ते पाच मुली होस्टेल सोडूनही गेल्या पण त्यांच्या जाण्याचे काही ही कारण समजले नाही .


    मुलींच्या मनातील भीती घालवण्यासाठी  डान्स कॉम्पिटीशन ठेवायचे अशे शिक्षकांनी ठरविले होते

  

सर्व सुरळीत चालू असताना मधेच असला प्रकार घडला व सर्वांच्या नजरेत रेवा वाईट ठरली


   मी काहीच केले नाही असं रेवानी सांगायचं खूप प्रयत्न केला पण कोणीही तिचे ऐकून घेत नव्हते .

   रूमवर पण रेवा अशीच त्रास देते असं  नैना सांगताच तिच्या पाठोपाठ कल्याणी व माधुरी नी आपल्याला रेवा कशी त्रास देते हे सांगितले .


     रेवा ही हुशार सुसंकृत व शांत स्वभावाची होती. तसेच ती पाहायला पण सुंदर होती . तिचे कधीच कोणासोबत वाद होत नव्हते ती खूप मनमिळाऊ होती . कोणाला मदत असो या शाळेतील कोणतेही  कार्यक्रम असो त्यात ती अग्रेसर असायची .


   मी तर कधीच कोणाला त्रास दिला नाही तरीही माझ्याच बाबतीत असं का घडावं याचे तिला खूप वाईट वाटले .


    सोनल तिची  बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तिच्या मृत्यू पासून ती खूप दुःखी असायची .त्यातुन ती स्वताला सावरतच होते तर तिच्यावर हे घाणेरडे आरोप लावले गेले .


       तिच्या रुममधल्या मुली सुद्धा तिच्यापासून लांब राहायच्या तिच्याशी बोलणे टाळायच्या  पण तिची घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिची होस्टेल वर राहायची मजबुरी होती . 


        रात्री साडेदहाच्या सुमारास वाचमेन काका आले  व निशाला  प्रिन्सिपल सराने बोलावले असा निरोप देत निघून गेले . ईतक्या रात्री सराने आपल्याला कशाला बोलावले असेल असा  प्रश्न तिच्या मनात आला .


    सोनल च्या मृत्यूनंतर रात्रीला मुली बाहेर जायला घाबरत असत पण सरांनी बोलाविले तर जावेच लागेल  असे मनाशी बोलत निशा उठली व बाहेर जायला निघाले तितक्यात


                    क्रमशः 


      पाहू या पुढील भागात। ????


                                          सुरेखा नंदरधणे✍️

   

     

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू