पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गीत लिहावे पुनश्च ताजे

गोकर्णावरी फुल पांढरे
हिरव्या वेली वरती साजे
फुलापरी त्या मनही माझे
पुनश्च नव्याने झाले ताजे॥धृ॥


सुकल्या बागेमधे पहा हे
अहा फुल हे कसे विराजे
विसरुन गेले मीच मलाही
नुरले काही काही न माझे॥१॥


दूर तिथे ही पहा अबोली
गुच्छ फुलांचे घेऊन लाजे
रुप अनोखे लेकुरवाळे
मला भावले असे हिचे हे॥२॥


तुळसं फुलली थोडी थोडी
धडे सुचवूनी आरोग्याचे
गवती चहाही वार्यावरी
पहा डोलवी अपुले पाते॥३॥


अशी बाग अन् मी बागेची
होऊन गाते गीत हे माझे
पुन्हा फुलावे पुन्हा रुजावे
गीत लिहावे पुनश्च ताजे ॥४॥


*--निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू