पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

किती जरी अंधुकलं

दाट दाटलं हे धुकं
सारीकडे अंधुकलं
अधे मधेच पाऊलं
कवितेचं थबकलं॥धृ॥


चल पुढे मी म्हणाले
वाट पुढली खुलेलं
माझ्या साऊने झेललं
गोटे दगड चिखल॥१॥


नाही पाऊल कुठेही
कधी तिचं थबकलं
शब्दधन तेही सारं
सांग अपुरं का झालं॥२॥


तिच्या मुळेच एकेक
अक्षरही गिरवलं
ओठी बालकाच्या जसं
ज्ञानामृत भरवलं॥३॥


एका धुक्याला पाहून
बळ तुझं का हरलं
घेई ध्यानी एकवेळ
सारं होईल सरलं॥४॥


भलं मोठ स्वप्न तिचं
थोड आम्ही आकारलं
पुरं करावं म्हणते
काही उरलं सुरलं॥५॥


चल म्हणून कविते
पुढे पाऊलं उचलं
तुझ्या आधारा वाचून
मन माझंही खचलं॥६॥


पार करु सारं सारं
धुकं कुणी बी रचलं
सारं विसरु धुक्यानं
किती जरी अंधुकलं॥७॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
¤○¤○¤○¤○¤○¤○¤○¤○¤○¤○¤

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू