पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्री स्वामी समर्थ केंद्र. दिंडोरी


" श्री स्वामी समर्थ "


श्री स्वामी समर्थ केंद्र " दिंडोरी नाशिक .
प्रत्यक्ष दर्शनाने धन्य झालो..
परम पूज्य गुरु माऊली श्री मोरे दादांना ही पाहता आले.


माझ्या वाचनात आले होते की
सद्गुरू परमपूज्य मोरे दादासाहेबांचे वडील म्हणजेच

परमपूज्य गुरुमाऊलीचे आजोबा.

श्री अप्पाजी मोरे – पाटील हे शेतीनिष्ठ, शूर, बुद्धिमान, सचोटी व प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले परोपकारी व्यक्ती होते.
दिंडोरी गावांत त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरीब निराधारांचे ते गोर गरिबांचे कनवाळू होते.


ज्या घराण्यात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे परमपूज्य सदगुरु मोरे दादा गुरुमाऊलींच्या रूपाने अवतरतात, त्या वंशाची ओळख परम स्वामी भक्त म्हणून होते हे सांगायला नको.


दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाशिक. येथे हजारो सेवेकरी मनापासून सेवा करण्यासाठी येतात हे ऐकून होतो.
त्यांची सेवे सोबत, अध्यात्मिक प्रगती होते व  सुखप्राप्ती ही होते असा बहुतेक लोकांचा अनुभव आहे.


दिंडोरी पुण्यभूमिला दिंडोरी वन असे पुरातन नाव होते.
त्याचे कारण म्हणजे दिंडोरवन हे दंडकारण्याचे प्रवेशद्वार होते 
नंतर दिंडोरवनाचे दिंडोरी हे नाव प्रचलित झाले.

असे म्हणतात हि भूमी त्रिवेणी संगमातून बनली आहे.
धारतीर्थ,देवतीर्थ,संततीर्थ यांचा संगम याच भूमीत झाला असावा.


माझी स्वामीवर अपार श्रद्धा असल्यामुळे बरीच वर्ष मनापासून दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्र पहायला जायची होती.


ही इच्छा मी, काकींना बोलून दाखवली होती आणि त्यानीं ही मला माहित आहे आपण नक्की जाऊ या म्हणून आश्वासन दिले.
त्यामुळे मी नक्की जायचं असं मनात पक्क केलं.
रविवारी मी व डोंबिवली च्या श्रीमती रोहिणी गोळे काकीं आम्ही जसे ठरवले,
त्या प्रमाणे सकाळी कसारा लोकल ने प्रवास करून पुढे आपल्या लाल परी ( ST Bus ) ने साधारण रु. 110/ मध्ये नाशिक मुंबई नाका. पर्यंत गेलो. तिथून पुढे रु.45/ मध्ये आपण दिंडोरी येथे पोहोचतो.


दिंडोरी येथे अतिशय प्रसन्न वातावरणात आल्यामुळे खूप आनंद झाला. शिस्त बद्ध पद्धतीने स्रिया व पुरुष वेगवेगळ्या मार्गीकेतून आत मठात प्रवेश करून दर्शन घेता येते.
मला प्रथमच आत गेल्यावर अंबा देवीच्या गाण्यावर झेंडा घेऊन व टाळ वाजवत ठेका घेण्याचा आनंद मिळाला.
खूप तल्लीन होऊन भक्त, टाळ, मृदंग यांचा आनंद घेत होते.


दर्शन घेऊन आल्यावर बाहेर गोशाळा आहे. गायीच्या शेणा पासून बरीच आयुर्वेदिक औषधी बनविले जातात.व विक्री ही करतात. त्यापेकी एक विशेष
गोमेय बसण्याचे आसन  मी पहिले.
श्री स्वामी समर्थ केंद्र पाहून प्रसन्न वाटतंय.


याचं सर्व क्रेडिट डोंबिवलीकर श्रीमती रोहिणी सुहास गोळे काकींना जातं.


खरंच काकींचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.


श्री स्वामी समर्थ,

जय जय स्वामी समर्थ ????


श्री. लव गणपत क्षीरसागर.
मोबाईल : 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू