पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप

निरोप तुझा घेऊनी

सख्या मी दूर झाले

दिलेली आश्वासने

हृदयात साठवून मी चालले ……


प्रेमात पाहिली स्वप्न ती

काळाने  हिरावून घेतले

काळजाचा घाव तो

अश्रूंनी लपवित मी चालले ….


कसे दाखवू तुला

विरहात अश्रू ओघळलेले

दिसेल का कधी तुला

काळजाला भगदाड पडलेले ……


आठवेल का तुला कधी

माझ्या प्रेमाची ती अनगीत फुले

देशील का एकदा तरी हाक

ज्या साठी कान हे आतुरले ……


तुझ्या सुखासाठी आज

भावनांना माझ्या मीच मारले

निरोप घेता तुझा 

उर माझे गलबलून आले ……

           

      सुरेखा नंदरधणे ✍️


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू