पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एड ची आयडिया

ऍड चीआयडिया 

 

(सौ.ज्योती अलोणे…)

 

वासू आणि रसिका दोघांचही बी.ए.एम.एस झालं… काही दिवस एका नामांकित डॉक्टर कडे प्रॅक्टिस करून वासुने आपलं स्वतंत्र क्लिनिक उघडण्याचं ठरवलं…

 

       सात जूनला क्लिनिक उद्घाटन झालं… पंधरा दिवस झाले..  उद्घाटनाला बरीच गर्दी होती…लोकांनी वासूच अभिनंदन केलं …खाऊन पिऊन आपापल्या घरी गेले…पण त्यानंतर क्लिनिकने गर्दी पाहिली नाही….                                                   वासुच्या बापाने  वास्तुला सांगितलं … 

 

                "आता या तुझ्यावर केलेला  हा क्लिनिकचा शेवटचा खर्च… पुढचं खर्च,  क्लिनिकचं भाडं वगैरे तुझं तू बघायचस!"

 

वासुने स्वप्न पाहणं सुरू केलं…सोबत त्याची डॉक्टर मैत्रीण रसिका !त्याच्यासोबतच शिक्षण घेऊन ..पुढे  वासुबरोबर लग्नाच्या आणा -भाका  घेतलेली … क्लिनिक मध्ये वासू सोबत तिनेही आपली खुर्ची त्याच्या बाजूला मांडली… 

 

    मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून लोकांच्या नजरा मृगधारा बरसण्याकडे लागतात… तसंच या दोघांचाही झालेलं होतं… काचेच्या दरवाजातून कोणी पेशंट येतो का म्हणून ते वाट बघायचे…पण  पण गप्पा मारायला येऊन फुकटचा सल्ला विचारणाऱ्या दोस्ता मित्रा शिवाय  अन्य कुणी पेशंट म्हणुन  येत नव्हतं…

 

    गंभीरपणे बसलेल्या वासुकडे बघून रसिकाला हसू आलं…. ती गुणगुणू लागली….

 

           " थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता…"  

तिचं लक्ष बाहेर गेलं.. आभाळात ढग जमून , अंधार पडल्यासारखा वाटत होता..पावसाळी वातावरण तयार झालं होतं…रसिकाचा चेहरा प्रफुल्लित झाला आणि ती वासुकडे बघून आनंदाने म्हणाली…

 

 

            "वासु आज पाऊस बरसणार म्हणजे बरसणार….!"

 

" रसिका माझ्या डोळ्यात धारा लागयच्या बाकी आहेत  आता पंधरा दिवस उलटून गेलेत…"

 

आणि तेवढ्यात मेघ गर्जना झाली, पावसाचे टपोरे थेंब पडू लागले..‌.. टपोरे थेंब पडता पडता जोरदार पावसाची सुरुवात झाली… कितीतरी वेळ  जोरात पाऊस सुरू होता…वातावरणात गारवा वाढला…  

 

             " वासू चल गाडी काढं.. आपण पावसात गरमा गरम भजे खायला जाऊ !"

 

           " वेडी आहेस का एवढ्या पावसात  कुठे जाणार…घर किती लांब आहे…

 भजीवाले तरी असेल का जागेवर भजे काढयला….!"

 

वासु बोलत होता आणि रसिकाने चेहरऱ्यावर थोडासं मेकअप केलं…ओठावर लिपस्टिक लावलं …. त्याला आपल्या बाजूला खेचत  पटकन एक सेल्फी घेतला…

 

 "एखाद्या हीरो हीरोइन पेक्षा कमी नाही आपली जोडी….!

एक प्रेमळ नजर वासूकडे टाकत आपली सुंदर दंतपंक्ती  दाखवत हसली ..

 

"हे चल नारे वासू, पावसात भिजायला!"

 

   "नाही नाही एवढ्या पावसात कुठे भिजायला जातेस!"

 

"अरसिकच आहेस तु!चल जाउया बाहेर…

  नुसतच पावसात भिजवून येऊ…!"

 

 आणि… रसिकाने वासुचा हात धरून त्याला बाहेर काढलं….

                      "रसिका एवढ्या पावसात भजी कुठे मिळणार आहे का ?"

 

             "तो बघ रोड पलीकडे समोरच्या टपरीवर  भजी काढणारा एकटाच उभा आहे…"

 

     वासुने आपली बाईक काढली.. रसिकाने मागच्या सीटवर बसून त्याच्या डोक्यावर छत्री धरली.. गाडी सुरू झाली आणि जोरदार वाऱ्याचा झोत आला रसिकाच्या हातातली छत्री उडून गेली…

वासु युटर्न घेऊन समोरच्या रस्त्यावरच्या टपरीवाल्या जवळ गाडी थांबवायला गेला तोच चिखलात  गाडीच चाक घसरलं आणि दोघेही खाली पडले… 

 वासुने टपरीजवळ गाडी उभी केली. भजीवाल्याच्या स्टॉलवर कोणीच नव्हतं.. तोही कुणीतरी येईल याची वाट बघत होता…

गिऱ्हाईक  आल्याबरोबर त्याचा चेहरा खुलला. त्याने गॅसची फ्लेम वाढवली..  आणि गरमागरम तेलात भजी टाकली..

गरम गरम तेलात तळत असलेल्या भज्याचा सुगंध नाकात जाऊन रसिकाच्या तोंडाला पाणी सुटत होतं…

भाजीवाल्याने प्लेटमध्ये गरमगरम भजे तिच्या समोर धरताच, तिने ऐक गरम भजा तोंडात टाकला आणि तिचं तोंड भाजलं                                "ऊई"करून ती ओरडली… तोपर्यंत वासुने चहावाल्याला चहाची ऑर्डर  दिली होती…. 

 

    चहाच्या टपरीवरील रेडिओवर..

 

 'बरसो रे मेघा…मेघा बरसो…' ‌

 

       गाणं सुरू झालं आणि रसिका मूडमध्ये आली होती.. तीने वासूच्या हाताला धरून त्याला पावसात खेचलं.. आणि दोघांचा रेन डान्स सुरू झाला….चहावाल्यांने रेडिओचा आवाज आणखीनच मोठा केला… आज रेडिओवर  सगळे पावसाचेच एका मागून एक गाणे लागलेले होते… त्यांना डान्स करताना पाहून रस्त्याने जातानाची काही कॉलेजची पोरं -पोरीही  थांबली आणि त्यांनीही  डान्स करायला सुरवात केली…                                     डान्स करता करता बाजूच्या गरमागरम भज्याचा आस्वादही घेणे सुरू होतं.. पावसात चहाचे कपावर कप रिकामे होत होते….  कुणी डान्सचे,कुणी भजे तळतानाचे भजेवाल्याचे, तर कुणी चहा वाल्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करू लागले … पाहता पाहता रस्त्यावर आणखीनच गर्दी वाढली….

 

     कोणीतरी म्हणालं प्री-वेडिंग शूटिंग सुरू आहे…

 

 तेवढ्यात रस्त्यावरून कुणा सिनेमा प्रोडक्शनची गाडी चालली होती.. गर्दी बघून त्यांनीही आपली गाडी थांबवली आणि एखाद्या हिरोला लाजवेल असा चिकना चोपडा स्मार्ट वासू  आणि सुंदर गोरी स्मार्ट रसिकाची जोडी पाहून कॅमेऱ्यावाला आपला कॅमेरा घेऊन सरसावला आणि तो डान्सच व्हिडिओ शूटिंग घेऊ लागला… मग काय सगळ्यांना  चेव आला… सगळेच जण  पावसात भिजत नाचू लागले..                                    पाऊस थांबत आला.. रसिकाने आपल्या गोड आवाजात सर्वांना विनंती केली…

 

  "आज पहील्या पावसात भिजून तुम्ही पावसाचा आनंद घेतला…  कदाचित सर्दी पडसं होईल…कदाचित चिखलात उड्या मारून पायाला चिखल्या झाल्या तर … तर आमचं समोरच  "प्रेमांकुर" नावाच क्लिनिक आहे…आपण आमच्याकडे पहिल्यांदा आलात तर व्हईजईट फी नसेल… पहिल्यांदा फ्री मध्ये उपचार केले जातील… तेव्हा नक्की आमच्या क्लिनिकला भेट द्या…."

 

 

 पाऊस थांबला..पण भजीवाल्याच्या व चहा वाल्याच्या टपरीवर गर्दी अजून होतीच…

 

 आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसाळी वातावरण होतं.. वासु रसिकाने गाडीवर बसून क्लिनिककडे येताना पाहिले… 

 

        आज भजेवाल्याच्या टपरी वर भली मोठी गर्दी दिसत होती… त्याच्या बाजूलाच चहाच्या टपरीवर चहा घेणाऱ्यांची गर्दी वाढलेली दिसली..  आणि क्लिनिक मध्ये पोहोचण्या अगोदरच वासूच्या " प्रेमांकुर" क्लीनिक समोर भली मोठी रांग लागलेली होती…. आणि त्यात  स्मार्ट वासू डॉक्टरांच्या भेटीला येणाऱ्या मुलींचा भरणा अधिक दिसत होता…

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू