पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

त्याला तिचा फोन आला.

FRIENDSHIP DAY च्या निमित्ताने त्याला तिचा फोन आला.

तिने विचारले, 
"आज तरी खरं सांग, मी फक्त मैत्रिणच होती का?"

तो म्हणाला,
"चुकतेयेस तू....."

त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडत तिने विचारले "म्हणजे?"

तो म्हणाला, "अगं तू होती काय म्हणतेस? तू तर आजही मैत्रिण आहेस."

ती म्हणाली,
"नेहमीसारखं आज मी बधणार नाही हं! मला माझ्या *फक्त* या शब्दाचं उत्तर हवंय."

त्याच्या चेहर्‍यावर धवल स्मित आणि लालिमा एकदाच अवतरले. 
तो म्हणाला, "खरं सांगू? मैत्रीचं नातं इतकं अनोखं असतं की, त्यात फक्त असं काही नसतं. त्याला इतके पैलू असतात की, तितके वैविध्यपूर्ण पैलू जगात अन्य कोणत्याच नात्याला नसतात. माणसाच्या नात्यांची खरी पूर्णता मैत्रीत होते. मैत्रीत अपूर्व अशी अपूर्णतायुक्त पूर्णता असते."

नेहमीप्रमाणेच ती त्याच्या उत्तराने बधली होती.


*मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

*चंसो*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू