पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नांच दर्पन

चिंब भिजत पावसात 

मन रमलय त्यात

मोहरल्या साऱ्या भावना

स्वप्नांच्या दर्पणात ….


आकाशी उतरले इंद्रधनू

उन्हासवे पावसात

आठवणीला आला बहर

स्वप्नांच्या दर्पणात ….


ओंजळीत घेता थेंब

मोत्यासारखे चमकतात

आठवणीच्या धुंद धुक्यात

नवकोंदन कोरले दर्पणात….


मेळ ऊन पावसाचा

घडे दरोरोज श्रावणात

सोबतीस असतो सदैव

स्वप्नांच्या दर्पणात….


   सुरेखा नंदरधने✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू