पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वातंत्र्य आपल्या नजरेतून

 

आजचा विषय.. स्वातंत्र आपल्या नजरेतून..

 

 

 

दिनांक -१५-८-२०२३

 

 

       "  बलसागर भारत होवो….

          विश्वात शोभुनी राहो…"

 

 आज या गाण्याचे बोल प्रत्यक्षात उतरल्याचं दिसत आहे.. काळाबरोबर  चालत आपल्या देशाने  पावले टाकायला सुरुवात केली. म्हणूनच आपल्या भारत देशाची प्रगती जगामध्ये सर्वतोमुखी आहे एक विकसनशील देश, एक होऊ घातलेला प्रगत देश.. केवळ 75 वर्षामध्ये आपल्या भारत देशाचे नाव जगात सर्वतोमुखी घेतले जात आहे  हा आपल्या देशाचा गौरव आहे, पर्यायाने सर्व देशवासीयाचा गौरव आहे आणि त्याकरता देशवासीयांनी अभिमान बाळगाला हवा…????

 

 

      स्वातंत्र्य हे देशालाच नव्हे तर  प्रत्येक मनाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला पाहिजे, प्रत्येक समूहाला पाहिजे …आपल्या देशात अनेक धर्मपंथ समूहासमूहाने राहणारे लोक आहेत.. ज्यावेळी भारताला  इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळायचे होते त्यावेळेस या सर्व धर्म पंथीयांच्या लोकांनी एकजुटीने  देशाच्यासाठी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला होता..

 त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, एकजुटीने आणि  बलिदानाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, आणि त्या एकजुटीनेच आतापर्यंत  स्वातंत्र्य टिकून आहे .  आजकाल प्रत्येक व्यक्तीला, समूहाला स्वातंत्र पाहिजे, पण नेमका स्वातंत्र्य म्हणजे काय या गोष्टीची जाणीव त्यांना नाही..

        त्यांना एकीची कींमत कळत नाही, यामुळे आपली एकजूट दिसत नाही.. त्यामुळे परकीय शक्तीला आपल्यामध्ये फूट पाडण्यात काहीच वेळ लागणार नाही.. भले तुमचे आपसात मतभेद असले तरी पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी आपल्या देशात स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकजुटीने  उभं दिसायलाच हवं…

 

 प्रत्येक जण स्वातंत्र्य उपभोगत आहे..  रूढी परंपरेच्या, अंधश्रद्धेच्या पगड्या खालून बाहेर निघतांना दिसत आहेत…भारताच्या प्रगतीच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया या अग्रेसर होताना दिसत आहेत, जगात आपलं आणि पर्यायाने आपल्या देशाचा नाव उंचावत आहे.. तरीही लोकांना स्वातंत्र्याबद्दल संभ्रम आहे... 

 

  देशाचा विकास हा कुणा एकट्याने होत नसतो ..त्याला साथ लागते देशवासीयांची आणि देशभक्ती ,देश प्रेम हे  मना मनात आहे म्हणूनच आज आपला भारत देश प्रगतीपथावर आहे हे मान्य करायला हवे…त्यामुळे आज शत्रुराष्ट्र आपल्या देशाकडे डोळा वर करून  बघण्याची हिंमत करत नाही..

 

 देशाचं सैन्य देशाच्या सीमांची रक्षा करतं पण देशांतर्गत नागरिकांना जाण असायला हवी की आपलं स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवावं याची.. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण आपला देशप्रेम ,आपल्या देशाबद्दलची आत्मियता प्रकट करू शकतो…. आपला परिसर स्वच्छ ठेवणे पाण्याची बचत करणे, इंधनाचा वापर कमी करणे ही  छोटीशी गोष्ट ही आपल्यासाठी वआपल्या देशासाठी करतो… पण याची आपल्याला जाणीवही नसते…

 

1936 झाली जेव्हा ऑलम्पिक मध्ये भारताने हॉकी खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं त्यावेळी जर्मन राष्ट्राध्यक्ष हिटलरने मेजर ध्यानचंदला जर्मन आर्मी जॉईन करण्याची ऑफर दिली होती.. पण मेजर ध्यानचंदानी त्यांना एका शब्दात सांगितलं की. 

 

 

       Indian is not sale

 

त्यावेळी हिटलर ने त्यांना म्हटलं  की जर्मनदेश  तुला तुझ्या देश प्रेमासाठी तुला सॅल्यूट करते…त्यावेळी देश आपला पार्थान त्यात होता..

 

स्वातंत्र्याच्या प्रतीक असलेल्या भारताचच्या ध्वजाचे तिन्ही रंग… केशरी, पांढरा, हिरवा मनामनात गहिरे उतरले पाहिजे तरच खरं देशप्रेम जागृत होईल.. भारताची आन-बान शान याचा रक्षक देशाचा प्रत्येक नागरिक आहे याची जाण मनात ठेवायला हवी

 

 

  आपल्या नशिबाने आपल्याला पारतंत्र्याची छळ पोहचली नाही.आपण स्वातंत्र  भारतात राहतो हे आपल्यासाठी अभिमानाची, गर्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे, म्हणून देशप्रेम रुजवण्यासाठी आपलं देशासाठी असलेलं कर्तव्य काय याची जाणीव असण्यासाठी आपण पुढच्या पिढीलाही त्या दृष्टीने मार्गदर्शन करायला हवं…

 

चला देशवासीयांनो विकसित भारतालच्या प्रगतीला साथ द्या.. आपल्या भारत देशाला पुन्हा एकदा, 

 

   

         "जहॉं डाल डाल पर                         सोनेकी चिडीया करती है बसेरा.                      वो भारत देश है मेरा…"

 

        हे सिद्ध करूया… पुन्हा एकदा आपल्या भारताला पूर्वीचा वैभव प्राप्त होत आहे, त्याला प्राप्त करण्यास आपण सहाय्यक होऊ या. बदलत्या भारताची तस्वीर सारा जग बघत आहे..

        अंतर्गत कलह कितीही असू द्या , इतके जाती, धर्म ,बोलीभाषा एकत्र नांदत आहे… एका घरात दोन व्यक्ती तर नांदू शकत नाही तुम्ही एवढ्या मोठ्या देश मध्ये इतके सगळे लोक राहून राहिले आहे… जगामध्ये एका देशात फक्त दोन वर्ण वेगवेगळे असले तरी त्यांच्यात वर्ण देश निर्माण होतो . आपल्या देशात विविधतेची परंपरा आहे तरी पण एकी आहे म्हणूनच आपला देशातील नागरिक जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहे व आपल्या भारत देशाची परंपरा पुढे नेत आहेत…

.. आपल्या बरोबरीने स्वतंत्र झालेले देश रसातळाला चाललेले आहेत.. काही देश अजूनही गुलामगिरीचं जीवन जगत आहेत.  जगात विकसित देशांच्या खांद्याला खांदा लावून आपण ताठ मानेने उभं राहू शकत आहे.. भारताची प्रगती जगातील इतर देश एक उदयास येणारी महासत्ता म्हणून आदराने बघत आहेत… लोकशाही असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे बोलण्याचा, आपला हक्क मागण्याचा.. पण या मिळालेल्या अधिकाराचा उपयोग एकमेकाचे ऊणे,दुणे न काढता लोक कल्याणासाठीच करायला हवा..

 

  पारतंत्र्यात असताना ,स्वातंत्र्याचा मेवा पुढील पिढीला चाखविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या  व देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या भारतीयांसाठी  नयनात दोन अश्रूंना जागा असु  द्या…

 

 

 "हिंदू भूमीचे जवान जे जे लढले सीमेवरती

   आणिक  वाहिली जीवन पुष्पे त्वद्विय चरणांवरती 

         वंदन त्यांना करून स्मरण त्यांचे करा.                                     मनी  वाहू द्या भारत देशाच्या अभिमानाचा  अखंड झरा..   "

 

           पेला अर्धा रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा पेला अर्धा भरलेला आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवुया….चला पुढील पिढीसाठी संदेश ठेवूया…

 

          हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे ..                            हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र  भारताचे… 

 

जयहिंद!!!!

 

 सौ.ज्योती अलोणे 

 (ज्योर्तिमयी)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू